27.3 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ स्वच्छता कर्मचाऱ्याना सौ.मेंढेच्या हस्ते भेटवस्तूचे वाटप

स्वच्छता कर्मचाऱ्याना सौ.मेंढेच्या हस्ते भेटवस्तूचे वाटप

0
30

भंडारा,दि.22ः-भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल मेंढे यांच्या सहचारिणी सौ.शुभांगी मेंढे यांच्या हस्ते आज दिवाळी निमित्त भंडारा नगर परिषदेतील सफाई कर्मचाऱ्याना भेट वस्तू देण्यात आल्या. याप्रसंगी सौ. शुभांगी मेंढे यांनी सर्वप्रथम आपला भंडारा शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याकरिता केलेल्या सहकार्याबद्दल सफाई कर्मचार्यांचे आभार व्यक्त केले. तसेच शहरातील नागरिकांना प्लास्टिक मुक्त व प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करावी असे आवाहन केले. याप्रसंगी उपाध्यक्ष मा.आशु गोंडाणे, लता चौधरी, आभा निनावे, मनिषा वैद्य तसेच दिनेश भवसागर  व अन्य कर्मचारी वृंद उपस्थित होते.