गडचिरोली,दि.22 – आधुनिक काळात महिलांचे धावपळीचे जीवन जगणे सुरू आहे. त्यामुळे धकाधकीचे जीवन जगतांना महिलांनी आरोग्य व सौंदर्य जपावे, असे प्रतिपादन नगराध्यक्षा योगिता पिपरे यांनी केले.गडचिरोली शहरातील एमआयडीसी रोडस्थित संचालिका वैशाली कोसरे यांच्या शगुन स्पा ब्युटी टिटमेंट पार्लरचे उद्घाटन नगराध्यक्षा योगिता पिपरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा योगिता पिपरे बोलत होत्या.
कार्यक्रमाचे उद्घाटक नगराध्यक्षा योगिता पिपरे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून दुर्गा मंगर, वैरागडेताई, सांगोडेताई, मानकरताई, पारधीताई, बारसागडेताई आदी मान्यवर उपस्थित होत्या.
पुढे बोलतांना नगराध्यक्षा योगिता पिपरे म्हणाल्या, महिलांना आधुनिक काळात विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. या समस्यांना दूर ठेवण्यासाठी आरोग्य सुधारित ठेवणे काळाची गरज आहे. त्यामुळे महिलांनी आधुनिक पध्दतीने जीवन जगतांना स्वताच्या जीवनमानाकडे लक्ष द्यावे, असेही नगराध्यक्षा पिपरे म्हणाल्या.कार्यक्रमाचे आभार संचालिका वैशाली कोसरे यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.





