
गोंदिया,दि.24: महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. देशाला दिशा दाखवणाऱ्या या राज्यावर सत्ता कुणाची याचा फैसलाही मतमोजणीनंतर होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ असलेल्या विदर्भात भाजपला नेमक्या किती जागा मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.त्यातच विदर्भात काँग्रेस किती जागावर विजय मिळविते याकडेही लक्ष लागले आहे.गोंदिया जिल्ह्यात गोंदियात अपक्ष आघाडीवर असून आमगाव मध्ये काँग्रेस आघाडीवर आहे.तिरोड्यात भाजप जागा कायम राखण्यात यशस्वी दिसत आहे.अर्जुनी मोरगावात मात्र माजी मंत्री बडोले मागे चालले आहेत.ब्रम्हपुरी येथे काँग्रेसचे विजय वड्डेटीवार हे आघाडीवर असून शिवसेनेसोबत त्यांची टक्कर आहे.तुमसर येथे भाजप तिसर्यास्थानी असून राष्ट्रवादीचे राजु कारेमोरे व अपक्ष चरण वाघमारे यांच्यात चुरस असून राष्ट्रवादीने आघाडी घेतली आहे.तर साकोली मध्ये मात्र भाजपने आता आघाडी घेतल्याने पटोले मागे गेले आहेत.भंडारा येथे अपक्ष भोंडेकर यांनी भाजपला मागे टाकले आहे.रामटेक मध्ये अपक्ष आशिष जायस्वाल तर चंद्रपूरात किशोर जोरगेवार पुढे चालले आहेत.
अहेरी विधानसभा
राजे आत्राम – 109520
दीपक आत्राम – 65710
धर्मराव बाबा आत्राम – 102089
आठव्या फेरी अखेर भाजपचे राजे आत्राम 7431 मतांनी आघाडीवर
पाचवा राऊंड तिरोडा-गोरेगाव
BSP (कमल हटवार) : 114 – 467
NCP (रविकांत बोपचे) : 2731- 11335
BJP (विजय रहांगडाले) : 3518 – 18769
अपक्ष (दिलीप बन्सोड): 96 – 277
वंचित (संदीप तिलगामे) : 1559 – 7875
नोटा : 59 एकूण 335 – एकूण मत : 39759 भाजप आघाडीवर
1 मलकापूर विधानसभा अपडेट फेरी—10
1)राजेश ऐकडे-काँग्रेस–39374
2)चैनसुख संचेती- भाजप–36489
3)प्रमोद तायडे- बसपा–593
4)नितिन नांदुरकर-वंचित आघाडी–5969
5)अवकाश बोरसे-अपक्ष–220
6)विजय गव्हाड-अपक्ष–3510
7)दत्ता ऐनकर-अपक्ष–102
8)प्रविण गावंडे-अपक्ष–127
9)बळीराम धाडे-अपक्ष–388
10)मजिद कुरेशी-अपक्ष–168
11)शेख आबिद-अपक्ष–275
12 नोटा—789 आघाडी– राजेश ऐकडे– 2885
बडनेरा मतदार संघातून अपक्ष रवी राणा 4800 मतांनी पुढे
तिवसा मतदार संघ फेरी नंबर 6
1-राजेश वानखडे-शिवसेना-19414
2-यशोमती ठाकूर-काँग्रेस- 17850 राजेश वानखेडे शिवसेना आघाडी-*1565
>> नागपूर जिल्ह्यातील ६ पैकी २ जागेवर काँग्रेस,गोंदियात 1 जागेवर,चंद्रपूरात 1 जागेवर अाघाड़ीवर
>> गडचिरोलीः पाचव्या फेरीत भाजपचे अंबरीश राव आत्राम १७९९ मतांनी आघाडीवर
>> पश्चिम नागपूरः तिसऱ्या फेरीअखेर विकास ठाकरे ३३९८ मतांनी आघाडीवर
>> नागपूर पूर्व: भाजपचे खोपडे ५९८४ मतांनी आघाडीवर
>> नागपूर पश्चिम: काँग्रेसचे विकास ठाकरे १७४ मतांनी आघाडीवर
>> नागपूर दक्षिण: भाजपचे मोहन मते २२०० मतांनी आघाडीवर
>> नागपूर उत्तर: काँग्रेसचे डॉ. नितीन राऊत २ हजार मतांनी आघाडीवर
>> नागपूर दक्षिण-पश्चिम: भाजपचे देवेंद्र फडणवीस ५१०३ मतांनी आघाडीवर
>> नागपूर मध्य: भाजपचे विकास कुंभारे २४५६ मतांनी आघाडीवर
>> अकोला पश्चिममधून काँग्रेसचे साजिद खान पठाण ९६१६ मतांनी भाजपाच्या गोवर्धन शर्मा यांच्या पुढे
>> मूर्तीजापूरमधून वंचितच्या प्रतिभा अवचार यांना ८०३ मतांची आघाडी
>> उमरखेडमध्ये भाजपचे नामदेव ससाणे १२६२ मतांनी पुढे.
>> पुसदमध्ये राष्ट्रवादीचे इंद्रनिल नाईक आघाडीवर.
>> तिसऱ्या फेरीत सुरेश भोयर काँग्रेस ५५० मतांनी पुढे.
>> चंद्रपूरमधून अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार, वरोरामधून काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर, चिमूरमधून काँग्रेसचे सतीश वारजूकर, ब्रम्हपुरीमधून काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, बल्लारपूरमधून भाजपचे सुधीर मुनंगटीवार, राजुरामधून काँग्रेसचे सुभाष धोटे आघाडीवर.
>> आर्णी मतदारसंघात दुस-या फेरीत कॉंग्रेसचे उमेदवार शिवाजीराव मोघे २०३५ मतांनी आघाडीवर
>> काटोल: राष्ट्रवादीचे अनिल देशमुख २५५ मतांनी आघाडीवर
>> सावनेर: काँग्सेसचे सुनील केदार मतांनी आघाडीवर
>> कामठी: भाजपचे टेकचंद सावरकर १३०० मतांनी आघाडीवर
>> हिंगणा: भाजपचे समीर मेघे १००० मतांनी आघाडीवर
>> उमरेड: भाजपचे सुधीर पारवे ६०० मतांनी आघाडीवर
>> रामटेक: अपक्ष आशिष जयस्वाल ७ हजार मतांनी आघाडीवर
>> खामगावः काँग्रेसचे ज्ञानेश्वर पाटील २६०८ मतांनी पुढे
>> साकोली मतदारसंघातून परिणय फुके ४६१ मतांनी आघाडीवर
>> देवळी मतदारसंघातून काँग्रेसचे रणजित कांबळे १० हजार १४२ मतांनी आघाडीवर
>> रामटेक: अपक्ष आशीष जयस्वाल ३५०० हजार मतांनी आघाडीवर
>> हिंगणा: भाजपचे समीर मेघे १००० मतांनी आघाडीवर
>> कामठी: भाजपचे टेकचंद सावरकर १३०० मतांनी आघाडीवर
>> सावनेर: काँग्रेसचे सुनील केदार आघाडीवर
>> काटोल: राष्ट्रवादीचे अनिल देशमुख २५५ मतांनी आघाडीवर
>> भंडाराः पहिल्या फेरीत अपक्ष नरेंद्र भोंडेकर आघाडीवर
>> चिखलीः भाजपच्या श्वेता महाले ११५० मतांनी आघाडीवर
>> दुसऱ्या फेरीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ५०९३ मतांनी पुढे
>> बडनेरा मतदारसंघात अपक्ष उमेदवार रवी राणा २५४ मतांनी पुढे
>> नागपूरः भाजपचे विकास कुंभारे १५०० मतांनी पिछाडीवर
>> नागपूरः पूर्वधून भाजपचे खोपडे ३५८६ मतांनी आघाडीवर. पश्चिममधून भाजपचे सुधाकर देशमुख ६१२ मतांनी आघाडीवर. उत्तरमधून काँग्रेसचे डॉ. नितीन राऊत ७०० मतांनी आघाडीवर तर दक्षिण-पश्चिममधून भाजपचे देवेंद्र फडणवीस २५६० मतांनी आघाडीवर
>> पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातून पहिल्या फेरीत भाजपचे कृष्णा खोपडे ३ हजार ५८६ मतांनी आघाडीवर.
>> नागपूरः कारंजा मतदारसंघातून भाजपचे राजेंद्र पाटनी तिसऱ्या फेरीअखेर २२०० मतांनी आघाडीवर
>> देवळीः काँग्रेसचे रणजीत कांबळे ४२६७ मतांनी आघाडीवर
>> वर्धाः भाजपाचे पंकज भोयर हे ७०० मतांनी आघाडीवर
>> अर्जुनी मोरगावमध्ये राष्ट्रवादीचे मनोहर चंद्रिकापुरे ४१४ मतांनी आघाडीवर
>> बल्लारपुरात भाजपचे सुधीर मुनगंटीवार आघाडीवर
>> गोंदिया मतदारसंघात अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल पहिल्या फेरीत आघाडीवर
>> वर्ध्यात काँग्रेसचे शेखर शेंडे आघाडीवर. देवळीमधून काँग्रेसचे रणजित कांबळे आघाडीवर तर हिंगणघाट मधून भाजपचे समीर कुणावार आघाडीवर
>> आर्वीः भाजपचे दादाराव केचे पहिल्या फेरीत ५५७ आघाडीवर
>> धामणगाव रेल्वे मतदारसंघात पहिल्या फेरीत भाजपाचे प्रताप अडसड ७२ मतांनी पुढे
>> दर्यापूर मतदारसंघातून काँग्रेसचे बळवंत वानखडे ६२१ मतांनी पुढे
>> पहिल्या फेरीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २ हजार ५६० मतांनी आघाडीवर
>> अमरावती मतदारसंघातील भाजपचे सुनील देशमुख १८९७ मतांनी आघाडीवर.
>> जळगाव जामोद मतदारसंघातील भाजप उमेदवार डॉ. संजय श्रीराम कुटे यांना पहिल्या फेरीत आघाडी
>> पश्चिम नागपूर मतदारसंघात टेबल क्रमांक १९ वर ईव्हीएमचे सील ओपन असल्याचा काँग्रेसकडून आक्षेप
>> नागपूरः हिंगणा मतदारसंघातून भाजपचे समीर मेघे, काटोल मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनील देशमुख पुढे.
>> नागपूरः टपाली मतदानात दक्षिण पश्चिम मतदार संघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आघाडीवर
>> विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात
>> वेगळ्या विदर्भाचं वचन देणाऱ्या भाजपला विदर्भ पुन्हा साथ देणार का याविषयी उत्सुकता




