37.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home महाराष्ट्र भाजप-शिवेसना 164 तर काँग्रेस-राष्ट्रवादी 93 जागांवर पुढे

भाजप-शिवेसना 164 तर काँग्रेस-राष्ट्रवादी 93 जागांवर पुढे

0
29

मुंबई/गोंदिया,दि.24ः- महाराष्ट्र आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालांना सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात झाली. यामध्ये महाराष्ट्रातील 288 आणि हरियाणातील 90 जागांचे प्राथमिक कल पुढे येत आहेत. यामध्ये महाराष्ट्रात आणि हरियाणातही भाजप आघाडीवर आहे. हरियाणात भाजपने सर्वच जागांवरून निवडणूक लढवली. तर महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेसह महायुतीचे उमेदवार मैदानात आहेत. महाराष्ट्रातील अनेक एक्झिट पोलमध्ये भाजप-शिवसेना पुन्हा सत्तेवर येणार असे भाकीत वर्तवण्यात आले आहे.

  • मुक्ताईनगर : 11 व्या फेरी अखेर रोहिणी खडसें याना 1323 चे मताधिक्य
  • जामनेर: गिरीश महाजन दहाव्या फेरीअखेर 18489 मतांची आघाडी
  • लातूर आघाडी

    लातूर शहर – अमित देशमुख (कॉग्रेस) लातूर ग्रामीण- धीरज देशमुख (कॉग्रेस औसा – अभिमन्यू पवार ( भाजप) निलंगा – संभाजी पाटील ( भाजप) अहमदपूर – बाबासाहेब पाटील ( राष्ट्रवादी) उदगीर – संजय बनसोडे ( राष्ट्रवादी)

  • परभणीत शिवसेनेचे डॉक्टर राहुल पाटील 32 हजार 965 मतांनी आघाडीवर. एकही विरोधक चार हजाराचा आकडा पार करू शकलेला नाही.
  • भोकर मतदार संघातून अशोक चव्हाणांनी घेतली 50 हजार मतांची आघाडी
  • भोकरदनमध्ये पाऊस, 8 व्या फेरी अखेर भाजपचे, संतोष दानवे 11747 मतांनी आघाडीवर
  • संगमनेरमधून बाळासाहेब थोरात आघाडीवर
  • जळगाव शहरात भाजपचे सुरेश भोळे 13 वी फेरी 30343 चा लीड
  • कोथरुडमधील यादी क्रमांक 127, राजा शिवराय प्रतिष्ठाण येथील एका EVM मशिनचा नंबर वेगळा असल्याची हरकत मनसेने घेतली आहे. त्यामुळे या एका टेबलवरील मतमोजणी थांबवली आहे.
  • महायुतीची 177 जागांवर तर आघाडी 89 जागांवर पुढे
  • औरंगाबाद पूर्व एमआयएमचे डॉ. गफ्फार कादरी 30 हजार मतांनी आघाडीवर, अतुल सावेंना हजारापेक्षा कमी मते
  • औरंगाबाद मध्य येथून प्रदीप जैसवाल 16,619 मतांनी आघाडीवर…
  • पूर्व औरंगाबादमधून एमआयएमचे डॉ. गफ्फार कादरी 16 हजार मतांनी पुढे
  • भोकर मतदारसंघातून अशोक चव्हाण 17 हजार मतांनी आघाडीवर
  • फुलंब्री औरंगाबादेत हरिभाऊ बागडेंना 5317, तर कल्याण काळेंना 3311
  • जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे गुलाबराव पाटील 6 व्या फेरी अखेर 13294 ने आघाडीवर
  • पुणेः आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून पहिल्या फेरीत दिलीप वळसे-पाटील यांनी आघाडी घेतली आहे त्यांना 3198 मिळाली आहे ती विरोधी शिवसेनेचे उमेदवार राजाराम बाणखेले यांना 391 मते मिळाली आहेत.
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे 24 हजार मतांनी आघाडीवर

  • परळी – महाराष्ट्र आणि विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 288 तर हरियाणातील 90 जागांचे प्राथमिक कल पुढे येत आहेत. राज्यात महायुती आघाडीवर आहे. पण, राज्याचे लक्ष लागून असलेल्या परळी मतदारसंघात पंकजा मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमदेवार धनंजय मुंडे आघाडी मिळवताना दिसत आहेत. दहाव्या फेरीअंती धनंजय मुंडे तब्बल अठरा हजार मतांनी आघाडीवर आहेत. हा निकाल पाहता परळीच्या जनतेने पंकजा मुंडेना नाकारल्याचे दिसून येत आहे.

    दरम्यान बीड शहरात काका-पुतण्यात काट्याची टक्कर पाहायला मिळते आहे. पिछाडीवर असलेले जयदत्त क्षीरसागर यांना सातव्या फेरीनंतर पुन्हा 1107 मतांनी आघाडी मिळाली आहे.

    केज – भाजपच्या नमिता मुंदडा 16140 मतांनी आघाडीवर.

    • 13 व्या फेरीअखेर धनंजय मुंडे 24246 मतांनी आघाडीवर आहेत.
    • बीड – सातवी फेरी, जयदत्त क्षीरसागर पुन्हा 1107 मताने आघाडीवर.
    • परळीत एकूण २४ फेऱ्या आहेत. 13 व्या फेरीअखेर धनंजय मुंडे हे 21741 मतांनी आघाडीवर आहेत.
    • परळीत एक लाख मतांची मोजणी पूर्ण, धनंजय मुंडे 18 हजार मतांची आघाडी. अद्याप सव्वा लाख मतांची मोजणी बाकी.
    • दरम्यान बीड शहरात काका – पुतण्यात काट्याची टक्कर पाहण्यात मिळते आहे. .

blank