सातारा,दि.24ः- विधानसभा निवडणुकांचे कल हाती येत असतानाचा सातारा लोकसभा पोटनिवडणुकीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाचे उदयनराजे भोसले सध्या पिछाडीवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास पाटील 30 हजार मतांनी आघाडीवर आहेत. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीतून खासदारकी मिळविली होती. मात्र काही महिन्यात उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला. त्यानंतर ही पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. उदयनराजे भोसले यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातारा येथे जाहीर सभा घेतली होती. साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणूक ही भाजपाने प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीबाबत शिवसेनेचे संजय राऊत म्हणाले होते की, उदयनराजे तीन महिन्यांपूर्वी एका पक्षातून निवडून येतात. ३ महिन्यात तुमचे ह्दयपरिवर्तन होते. दुसऱ्या पक्षात जाऊन लोकांवर निवडणूक लादता. लोकांना गृहित धरण्याचा परिणाम या निवडणुकीत दिसेल. भाजपातून निवडणूक लढवायची होती तर आधीच लढवायची होती. लोकसभा पोटनिवडणुकीसाठी २०-२५ कोटी सरकारी तिजोरी खर्च करुन लोकांवर निवडणूक लादावी याचा परिणाम १०० टक्के निकालात दिसेल असं त्यांनी सांगितले होते.
सातारा लोकसभा पोटनिवडणुक :
श्री. छ. उदयनराजे : 177062
श्रीनिवास पाटील : 207268
श्रीनिवास पाटील 30206 मतांनी आघाडीवर
कोल्हापुरातील आघाडीवर असलेले उमेदवार
कोल्हापूर दक्षिण – ऋतुराज पाटील (काँग्रेस)
कोल्हापूर उत्तर – चंद्रकांत जाधव (काँग्रेस)
करवीर – पी. एन. पाटील (काँग्रेस)
शाहुवाडी- सत्यजित पाटील सरुडकर (शिवसेना)
राधानगरी- प्रकाश आबिटकर (शिवसेना)
चंदगड – आप्पी पाटील (अपक्ष)
कागल – हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी)
शिरोळ – राजेंद्र पाटील यड्रावकर (अपक्ष)
हातकणंगले – राजुबाबा आवळे (काँग्रेस)
इचलकरंजी – प्रकाश आवाडे (अपक्ष)
जत विधानसभा अपडेट
11 व्या फेरी अखेर कांग्रेसचे विक्रमसिंह सावंत 22299 मतांनी आघाडीवर
1)जत : विक्रमसिंह सावंत ( काँग्रेस)
फेरी मिळालेली मते लीड
1 3826 1326 आघाडी
2 4163 1845 ने लीड
3 7982
4 4663
5 4625
6 4308
7 4244
8 4062 14181
9 4833
10 5743 जत
11 4112
एकूण मते अखेर 49074
2)आ. विलासराव जगताप (भाजप)
फेरी मिळालेली मते
1 2486
2 2318
3 4614
4 2391
5 3271
6 2167
7 2602
8 3214
9 2472
10 2237 जत
11 1861
एकूण मते अखेर 26775
3)डॉ रविंद्र आरळी (स्वाभिमानी आघाडी)
फेरी मिळालेली मते
1 1326
2 2184
3 3510
4 1057
5 694
6 2000
7 1557
8 768
9 1771
10 1305 जत
11 1894
एकूण 16408 अखेर




