33.9 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका -मनोहर चंद्रिकापुरे

सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका -मनोहर चंद्रिकापुरे

0
45

अर्जुनी मोरगाव,दि.26ः-सर्वसामान्य माणसांचे प्रश्न अगदी क्षुल्लक आहेत. मागील काळात ते सुटू शकले नाही. ते सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. रखडलेले सिंचन प्रकल्प, रस्ते, पर्यंटन, शेतकऱ्यांच्या समस्या व इतर विकास कामांना प्राधान्य देऊन जनताजनार्धनाची सेवा करणार असल्याचे मत नवनिर्वाचित आ मनोहर चंद्रिकापुरे यांनी व्यक्त केले.
ते तालुक्यातील धाबेपवनी,गोठणगाव, केशोरी, महागाव,खामखुरा, इटखेडा,धाबेटेकडी, बोडगावदेवी व चांनाबाकटी येथील गावकऱ्यांचे आभार व सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. महागाव येथे आयोजित सभेत व्यासपीठावर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भागवत नाकाडे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष लोकपाल गहाणे, प्राचार्य यशवंत परशुरामकर, पं स सदस्य जनार्धन काळसरपे, सरपंच प्रमोद लांडगे, दुर्गा ठाकरे, डॉ अविनाश काशीवार, शेषराव देशमुख, प्रमोद लांजेवार, यशवंत गणवीर, राकेश जायस्वाल,परेश उजवणे,माजी सरपंच त्र्यंबक झोडे उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले, सत्तांध लोकांची धुंदी उतरविण्याचे काम आपण करणार आहोत. भाजप सरकारने कर्जमाफी दिली अद्याप अनेक शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही. महागाव परिसरात ७०० शेतकऱ्यांचे पावसाने नुकसान झाले होते त्यांना अद्याप पैसे मिळाले नाही. सद्या अवकाळी पाऊस सुरू आहे, त्याचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. वनजमिनीचे पट्टे अतिक्रमण धारकांना देण्यात आले नाही. जनतेच्या ज्वलंत समस्या व विकासकामांना प्राधान्य देणार असल्याचे ते म्हणाले.

blank