27.3 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ पोलीस स्मृती दिनानिमित्त नवेगावबांध पोलिसांची शहीद दिपक रहिलेना श्रद्धांजली

पोलीस स्मृती दिनानिमित्त नवेगावबांध पोलिसांची शहीद दिपक रहिलेना श्रद्धांजली

0
46

नवेगावबांध,दि.26- राष्ट्रीय पोलीस शहीद दिनानिमित्त शहिद पोलीस उपनिरीक्षक दीपक राहिले यांना नवेगावबांध पोलीस ठाण्याच्या वतीने 23 ऑक्टोंबरला येथील जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे  श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 21 ऑक्टोबरला भारतात शहीद झालेल्या पोलिसांच्या स्मृती जागवण्यासाठी पोलीस विभागाच्या वतीने दरवर्षी शहीद दिन पाळला जातो. चिचगड पोलिस स्टेशनच्या हद्दीत सिंगनडोह गावाजवळील पुलावर 20 जानेवारी 2003 ला नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भू-सुरुंग स्फोटात पोलीस उपनिरीक्षक दीपक सखाराम रहीले कान्होली सोनार येथील रहिवासी शहीद झाले होते. या कार्यक्रमाला शहिद दिपक राहिले यांचे भाऊ महेंद्र रहिले, जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ एम व्ही टाकसाळे सहाय्यक शिक्षक श्री भास्कर मानापुरे,राजीव बोरकर, राजेंद्र बावनकर, ठाणेदार अनिल कुंभरे, सहाय्यक फौजदार सयाम उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांनी शहिद दीपक रहिले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. दोन मिनिटे मौन पाळण्यात आले. उपस्थित अतिथींनी शहिद दीपक राहिले यांच्या बलिदानाचा विषयी ठाणेदार श्री अनिल कुंभरे, प्राचार्य टाकसाळे. महेंद्र रहिले यांनी मनोगत व्यक्त करून, त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. तसेच विद्यार्थ्यांना शहीद दिनाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच अकरावी विज्ञान मध्ये शिकणारी विद्यार्थिनी प्रतिभा डोंगरवार हिने शहिद गीत सादर केले. प्रास्ताविक ठाणेदार कुंभरेयांनी केले. कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक शिक्षक राजेन्द्र बावनकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार पोलीस शिपाई आनंद रुद्रवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस हवालदार नाकाडे, नायक ताराम, येरणे, मिसार यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व पोलिस विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.