• जिल्हा प्रशासनाचे आवाहन
• ३१ ऑक्टोबर रोजी आयोजन
वाशिम, दि. २९ : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार, ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी ‘रन फॉर युनिटी’चे आयोजन करण्यात आले आहे. या एकता दौडमध्ये वाशिम शहर व जिल्ह्यातील युवक-युवती, खेळाडू, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यासाठी दर वर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ‘रन फॉर युनिटी’चे आयोजन करण्यात येते. यावर्षी ही दौड जिल्हा क्रीडा संकुल येथून सुरु होणार असून नवीन शासकीय विश्रामगृह, जिल्हाधिकारी कार्यालय, राजस्थान आर्य महाविद्यालय, सामान्य रुग्णालय मार्गे पुन्हा जिल्हा क्रीडा संकुल येथे आल्यानंतर दौडचा समारोप होईल. ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० वाजता ही दौड सुरु होणार असून यामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी सकाळी ७ वाजेपर्यत वाशिम जिल्हा क्रीडा संकुल येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.




