* प्रत्येक शेतकऱ्याने वैयक्तिक स्वरूपात माहिती देणे बंधनकारक
* विमा कंपनी प्रतिनिधी, बँकेकडे माहिती त्वरीत सादर करावी
* विमा कंपनी प्रतिनिधी तालुका कृषि अधिकारी कार्यालयात उपस्थित
* शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात
वाशिम, दि. २९ : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील उभ्या पिकांचे व कापणी झालेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे वैयक्तिक पंचनाम्याची तरतूद आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान हे वैयक्तिकस्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येणार आहे. तरी प्रधानमंत्री पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाच्या नुकसानाची माहिती वैयक्तिकरित्या संबंधित विमा कंपनीचे समन्वयक अथवा ज्या बँकेत विमा हप्ता भरला आहे, त्या बँकेकडे विहित नमुन्यात त्वरीत सादर करावी, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यात तालुका कृषि अधिकारी कार्यालयात उपस्थित राहून संबंधित विमा कंपनीचे प्रतिनिधी शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारत आहेत.
संबंधित विमा कंपनीचे प्रतिनिधी, ज्या बँकेत विमा हप्ता भरला आहे त्या बँकेला अथवा संबंधित गावाचे कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी यांच्याकडे विहित नमुन्यातील अर्ज, सातबारा, पीक विमा भरल्याची पावती सादर करणे आवश्यक आहे. पीक विमा कंपनीमार्फत तालुकास्तरावर समन्वयक नेमण्यात आले आहेत. ज्ञानेश्वर बोबडे (भ्रमणध्वनी क्र. 8766926969) यांची वाशिम तालुका व जिल्हा समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. महादेव जगताप (भ्रमणध्वनी क्र. 9423486699) यांची मालेगाव तालुका समन्वयक, हरीश जोगदंड (भ्रमणध्वनी क्र. 8888596069) यांची रिसोड तालुका समन्वयक, भूषणकुमार लाहे (भ्रमणध्वनी क्र. 7776949981) यांची मानोरा तालुका समन्वयक, अर्जुन पवार (भ्रमणध्वनी क्र. 7038700449, 8552904697) यांची मंगरुळपीर तालुका समन्वयक आणि मंगेश घुले (भ्रमणध्वनी क्र. 9767359909) यांची कारंजा तालुका समन्वयक म्हणून विमा कंपनीने नियुक्ती केली आहे. या सर्व तालुका समन्वयकांनी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात उपस्थित राहून शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. तरी शेतकरी बांधवांनी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात विमा कंपनी समन्वयक यांच्याशी संपर्क साधून नुकसानाची माहिती विहित नमुन्यात तात्काळ सादर करावी.
विमा कंपनीच्या 1800 116 515 या टोल फ्री क्रमांकावर सुद्धा शेतकरी आपल्या पिकांच्या नुकसानाची माहिती कळवू शकतात. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी वाशिमचे तालुका कृषि अधिकारी अभिजीत देवगिरीकर (भ्रमणध्वनी क्र. 7588008578), मालेगावचे तालुका कृषि अधिकारी शशिकांत जांभरुणकर (भ्रमणध्वनी क्र. 9405966966), रिसोडचे तालुका कृषि अधिकारी नंदकुमार मिसाळ (भ्रमणध्वनी क्र. 8275919596), मंगरूळपीरचे तालुका कृषि अधिकारी सचिन कांबळे (भ्रमणध्वनी क्र. 9067597276), कारंजाचे तालुका कृषि अधिकारी संतोष वाळके (भ्रमणध्वनी क्र. 9422921090), मानोराचे तालुका कृषि अधिकारी सचिन कांबळे (भ्रमणध्वनी क्र. 9067597276), जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर (भ्रमणध्वनी क्र. 9167250935), अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे श्री. सरनाईक (भ्रमणध्वनी क्र. 8275009964) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.





