25.8 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home क्रीडा गोंदियात राष्ट्रीय एकता दिवसानिमित एकता दौडचे आयोजन अनेकांचा सहभाग         

गोंदियात राष्ट्रीय एकता दिवसानिमित एकता दौडचे आयोजन अनेकांचा सहभाग         

0
31

गोंदिया दि. 31 :  माजी उपप्रधानमंत्री तथा गृहमंत्री पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिवसाचे औचित्य साधून आज 31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकतेचा संदेश देणाऱ्या एकता दौड (रन फॉर युनिटी) चे आयोजन सकाळी 7.30 वाजता गोंदिया येथील इंदिरा गांधी स्टेडियम येथून करण्यात आले. प्रारंभी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करुन जिल्हा क्रीडा अधिकारी अब्दुल मुस्ताक आणि ज्येष्ठ धावपटू मुन्नाजी यादव यांनी मशाल प्रज्वलित केली. यावेळी उपस्थितांना राष्ट्रीय एकतेची शपथ देण्यात आली.

राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त जिल्हा प्रशासन,गोंदिया व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गोंदिया यांच्या संयुक्तवतीने ‘रन फॉर युनिटी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एकता दौडमध्ये  खेळाडू, कर्मचारी, शहरातील विद्यालय- महाविद्यालयाचे विद्यार्थी,क्रीडा अधिकारी, प्रशिक्षक यांच्यासह  नागरिक सहभागी झाले होते. सर्वांनी उत्साहाने दौडमध्ये सहभाग घेतला. ही एकता दौड इंदिरा गांधी स्टेडियम येथून जयस्तंभ चौक, गुजराती विद्यालय,पाल चौक पोहचली.या चौकातील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला श्री.मुस्तक व श्री.यादव यांनी पुष्पहार अर्पण केला. दौड त्याच मार्गाने परत येऊन इंदिरा गांधी स्टेडियम येथे  एकता दौडचा समारोप  करण्यात आला. यशस्वीतेसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक नाजूक उईके,क्रीडा संघटक विशाल ठाकूर,अनिल सहारे,मुजीब बेग,निलेश फुलबांधे,संदीप मेश्राम,श्री.कम्मू,स्नेहदीप कोकाटे,रविना बरेले,शेखर बिरणवार,उपेंद्र थापा,सऋतिक कटरे,अनिल एलूरू,रवी रहांगडाले,पूर्वा अग्रवाल, ओम भादुपोते यांनी पुढाकार घेतला