26.3 C
Gondiā
Thursday, August 6, 2026
Home क्रीडा गडचिरोली मध्ये राष्ट्रीय एकता दौडचे यशस्वी आयोजन

गडचिरोली मध्ये राष्ट्रीय एकता दौडचे यशस्वी आयोजन

0
34

गडचिरोली,दि.31(जिमाका) : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्म दिनानिमित्त आज राष्ट्रीय एकता दिन गडचिरोली मध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा प्रशासन, पोलिस दल, केंद्रीय राखीव दल यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी  ७ वाजता  राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजय बंसल, केंद्रीय राखीव दलाचे 192 सेकंड कमान अधिकारी दीपककुमार साहू ,तुकडीचे कमांडर जियाऊ सिंह यांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून दौडला सुरुवात करण्यात आली.यावेळी डि.एस.कुळमेथे अपर जिल्हाधिकारी, ए.एल.वालस्कर निवासी उप जिल्हाधिकारी, एस.के. चडगुलवार नायब तहसिलदार निवडणूक विभाग, बांबोळे हरिष, विधी अधिकारी, या कार्यक्रमास उपस्थित होते.

या राष्ट्रीय दौडमध्ये केंद्रीय राखीव दलाचे जवान, पोलीस दलाचे  जवान, युवक-युवती, विद्यार्थी, खेळाडू, व्यापारी, सर्व नागरिकांनी सहभाग घेतला.यावेळी उपस्थित प्रशासकीय कर्मचारी, पोलीस दलाचे जवान, केंद्रीय राखीव दलाचे जवान, नागरिक, शालेय विद्यार्थी यांना पोलिस अधीक्षक अजय बंसल यांनी एकात्मतेची शपथ दिली.