28.9 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home क्रीडा आशियाई स्पर्धा पदक विजेता ज्योती गडेरियाचा गौरव

आशियाई स्पर्धा पदक विजेता ज्योती गडेरियाचा गौरव

0
30

मोहाडी,दि.01ःकोरियामध्ये आयोजित एशियाई पॅरा रोविंग चॅम्पियनशिपमध्ये मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव येथील ज्योती राधेश्याम गडेरिया हिने संपूर्ण एशियामध्ये कांस्य पदक पटकाविल्याबद्दल भारतीय विद्यार्थी परिषद भंडारा शाखा मोहाडीच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला.
ज्योती एका पायाने अपंग आहे. कर्नल गौरव दत्ता भारतीय सैन्यात कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे ज्योतीने भारत देशाचे नेतृत्व करीत विजय प्राप्त केला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे ज्योतीने भंडारा जिल्हापासून कोरियापयर्ंतचा टप्पा गाठला. ज्योती राधेश्याम गडेरिया हिचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भंडारा जिल्हा संयोजक महेंद्र गभने, तुमसर भाग संयोजक मिनाल जिभकाटे, दुर्गेश खोब्रागडे, अनिकेत सेलोकर, ज्योतिष पंचभाई, जीवन सेलोकर, सिद्धेश मांढरे, समीर नान्हे, अंकित गभने, नितेश सेलोकर आदी. अभाविप कार्यकर्ते हजर होते. अभाविपतर्फे शक्य ती मदत करण्याचे आश्‍वासन देण्यात आले.