28.9 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home विदर्भ केंद्रीय राखीव पोलीस दलाचे डिआयजी मानस रंजन यांनी मानले जनतेचे आभार

केंद्रीय राखीव पोलीस दलाचे डिआयजी मानस रंजन यांनी मानले जनतेचे आभार

0
36

गडचिरोली,दि.01ः-विधानसभा निवडणूक 2019 शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व केंद्रीय राखीव दलाच्या कामात आम जनतेनी जे सहकार्य केले. ते अत्यंत वाखाणण्याजोगे आहे. याबध्‍दल मी सर्वांचे मन:पुर्वक आभार मानतो असे आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डीआयजी मानस रंजन यांनी मत व्यक्त केले.   यावेळी सीआरपीएफचे अधिकारी जे. सिंग व कैलास गंगावणे प्रामुख्याने उपस्थित होते.कोणतीही दुर्घटना न होता ही निवडणूक संपन्न झाली. असेच सहकार्य नागरिकांकडून अपेक्षीत आहे.  शासकीय योजनांची व्यवस्थीत अंमलबजावणी होण्यासाठी सर्वांचे सहकार्य असेच लाभणे आवश्यक आहे.  दुर्गम भागातील आदिवासी युवकांना भारत दर्शन करण्याकरीता सहल आयोजीत केली जाते, यामध्ये सहभाग नोंदवावा असे त्यांनी आवाहन केले आहे. जिल्ह्यातील युवकांना रोजगार उपलब्ध  होण्याकरीता विविध प्रकारचे प्रशिक्षण, साहित्य व आर्थिक मदत दिल्या जात आहे. तेव्हा युवकांनी याचा लाभ घ्यावा असेही त्यांनी यावेळी म्हणाले.

blank