27.7 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home विदर्भ जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पॅनल वकिलचे दोन दिवशीय प्रशिक्षण

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पॅनल वकिलचे दोन दिवशीय प्रशिक्षण

0
41

गोंदिया दि.1: राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शिकेप्रमाणे माहे ऑक्टोबर महिन्यात गोरेगाव आणि गोंदिया तालुक्यातील सर्व पॅनल वकील यांच्याकरिता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया यांच्यावतीने 18 व 19 ऑक्टोबर रोजी दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुहास माने यांनी सर्व पॅनल वकिलांना कायदेविषयक मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुहास माने हे होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एम बी दूध प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी सर्व पॅनल वकिलांना मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे भट्टाचार्य, दिवानी न्यायाधीश एन. आर. वानखेडे,सहदिवाणी न्यायाधीश जे.एम.चौहान, सहदिवाणी न्यायाधीश व्ही.के.पुरी,ऍड.आर के बोरकर, ऍड. आर.डी बोबार्डे, महेश चांदवानी,जिल्हा सरकारी अभियोक्ता,ऍड. भगवती तुरकर, सहायक सरकारी वकील पी.एच. आगाशे यांनी उपस्थित सर्व पॅनल वकिलांना वेगवेगळ्या कायद्याचे विषयावर मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी 19 ऑक्टोबर रोजी विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मतदार जागृती या विषयावर  एक लघु नाटिका सादर केली. कार्यक्रमाचे आभार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एम.बी.दुधे यांनी मानले.यशस्वितेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक आर. जी .बोरीकर, जी.सी. ठवकर, एस एम कठाणे,पी.एन.गजभिये,एल.पी. पारधी,एस.एस.पारधी व डी. डी मेश्राम, यांनी सहकार्य केले.

blank