27.7 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home विदर्भ जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच कार्यालयाचे उद्घाटन 2 नोव्हेंबर रोजी

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच कार्यालयाचे उद्घाटन 2 नोव्हेंबर रोजी

0
61

गोंदिया दि.1: गोंदिया येथील नवीन प्रशासकीय इमारतीमधील दुसऱ्या माळ्यावरील खोली नंबर 24 येथे असलेल्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच कार्यालयाचे उद्घाटन आज 2 नोव्हेंबर रोजी  दुपारी 12.30 वाजता राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती ए.पी.भंगाळे यांच्या शुभहस्ते होणार आहे. राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग महाराष्ट्र राज्य परिक्रमा खंडपीठ नागपूरचे न्यायिक सदस्य ए. जे.खाँज़ा आणि जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच गोंदियाचे अध्यक्ष बी.बी.योगी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. तरी या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे.असे आवाहन जिल्हा ग्राहक  तक्रार निवारण मंचचे प्रबंधक हेमराज बोकडे व सदस्य  श्रीमती सरिता रायपुरे यांनी केले आहे.