गोंदिया दि.1 : राष्ट्रीय हरित लवाद यांनी थायलंड मागुर माशाच्या उत्पादन व विक्रीवर बंदी घातली आहे. प्रतिबंधित थायलंड मागुर माशाचे अस्तित्वात असलेले मत्स्यसाठे नष्ट करण्याचे शासनाने निर्देश दिले आहे. संबंधित उत्पादक व विक्रेते यांनी सदर साठे तात्काळ नष्ट करावे. जिल्ह्यात ज्या ठिकाणी मत्स्य कास्तकारांकडे व मत्स्य व्यापाऱ्यांकडे थायलंड मागूर मत्स्यसाठा असेल त्यांनी पर्यावरणास हानी न पोहचवता तात्काळ मत्स्यसाठे नष्ट करावे. थायलंड मांगुरचे उत्पादन घेतांना माशांना कोंबड्यांचे, कत्तलखान्यात कुजलेले शेळी-मेंढी गाई-म्हशी इत्यादींचे खाद्य म्हणून वापरले जाते. त्यामुळे पर्यावरणाची हानी होते व हा मासा मानवी प्रकृती घातक आहे. त्यामुळे राष्ट्रीय हरित लवाद यांनी 22 जानेवारी 2019 च्या निर्णयाद्वारे बंदी घातली आहे. त्यामुळे जिल्ह्यात मागूर मत्स्य उत्पादक व मत्स्य वाहतूक करणारे यांच्यावर कारवाई येत आहे.असे सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय श्री चांदेकर यांनी कळविले आहे.





