38.2 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home क्रीडा क्रीडा विभागाच्या कॉपी बुकसाठी क्रीडाविषयक एतिहासिक माहिती मागविली

क्रीडा विभागाच्या कॉपी बुकसाठी क्रीडाविषयक एतिहासिक माहिती मागविली

0
23

गोंदिया दि.1: राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत खेळाडू,क्रीडा संस्था, शैक्षणिक संस्था, विविध शासकीय व निमशासकीय कार्यालये तसेच तालुका, जिल्हा क्रीडा संकुलातील अधिकारी, कर्मचारी ,क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा तज्ञ ,क्रीडा शिक्षक व क्रीडाप्रेमी या सर्वांच्या माध्यमातून जिल्ह्यात क्रीडा विषयक ऐतिहासिक कामगिरी करण्यात येत असते.सदर एतिहासिक क्रीडाविषयक कामगिरीचा विसरत नागरिकांना होऊ नये यासाठी क्रीडा विभागाने कॉपी बुक तयार करण्याचे काम सुरू केले आहे.  क्रीडा विभागाचे कॉपी बुक तयार करण्यासाठी जिल्ह्यातील खेळाडू, क्रीडा संस्था ,शैक्षणिक संस्था, विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयामार्फत एखाद्या खेळाडूची ऐतिहासिक कामगिरी/ कथा,खेळाडूने घरच्या प्रतिकूल परिस्थितीत मिळविलेले यश याची माहिती, झालेल्या ऐतिहासिक कामांचे ,सुविधांचे फोटो समाजाच्या हितासाठी कार्य केलेल्या खेळाडूंची अनन्यसाधारण कामगिरी अथवा एखाद्या खेळातील माणूस म्हणून दर्शन घडवणारा प्रसंग या वरील माहिती तात्काळ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, बालाघाट रोड, मरारटोली गोंदिया येथे क्रीडाविषयक ऐतिहासिक कथा व फोटोग्राफ सादर करावे. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अब्दुल मुस्ताक यांनी केले आहे.

blank