37.1 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ धानखरेदी केंद्र त्वरित सुरू करा : आ.विनोद अग्रवाल

धानखरेदी केंद्र त्वरित सुरू करा : आ.विनोद अग्रवाल

0
79

blank

गोंदिया,दि.01 : गोंदिया जिल्हा हा धानपिकाचा जिल्हा असून जिल्ह्यात प्रामुख्याने धानपिक घेतले जाते. आजघडीला पीक कापणी व मळणीवर आलेले आहे. हंगाम अंतिम टप्प्यात असून शेतकरी धानपिक मळणीच्या कामाला लागला आहे. मात्र, अद्याप शासकीय आधारभूत धानखरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले नाही. यामुळे गोंदिया विधानसभा क्षेत्रासह जिल्ह्यातील शेतकर्‍यांपुढे शेतमाल विक्री करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या बाबीची दखल घेत आमदार विनोद अग्रवाल यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत आज (दि. १) ला जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे अधिकारी खर्चे यांच्याशी दूरध्वनी मार्फत चर्चा केली. जिल्ह्यात धानखरेदी केंद्र सुरू करण्यात विलंब होत असल्याची माहिती घेतली असता, जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने होत असलेल्या दिरंगाईला येणार्‍या अडचणी मार्गी लावून येत्या 3 दिवसात गोंदिया विधानसभा क्षेत्रासह जिल्ह्यात त्वरित धानखरेदी केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिले.याप्रसंगी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकार्‍यांनी लवकरच धानखरेदी केंद्र सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे शेतकर्‍यांनी इतरत्र कमी दरात धानविक्री न करता शासकीय आधारभूत धानखरेदी केंद्रात धान विकावे अशी विनंती आ.विनोद अग्रवाल यांनी केली आहे.

blank