गोंदिया, दि. ०२ : पालकमंत्री डॉ. परिणय फुके हे २ व ३ नोव्हेंबर २०१९ रोजी गोंदिया जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.पालकमंत्री डॉ. फुके हे २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी लाखांदुर (जि. भंडारा) येथून गोंदियाकडे प्रयाण करतील. गोंदिया निवास येथे त्यांचे आगमन होईल व मुक्काम. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता ते गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात गोंदिया जिल्ह्यातील ओला दुष्काळ संदर्भात बैठक घेतील. त्यानंतर दुपारी १२ वाजता गोंदिया तालुक्यातील ओला दुष्काळ पाहणी करतील. तसेच सोयीनुसार गोंदिया येथून नागपूरकडे प्रयाण करतील.





