30.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ लाखनीत वाहतुकीची समस्या कायम सर्विस रोड वर अतिक्रमण कायम

लाखनीत वाहतुकीची समस्या कायम सर्विस रोड वर अतिक्रमण कायम

0
62

अपघातांचे प्रमाण वाढले, सर्विस रोड पूर्णपणे उखडले.

कामाच्या धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचे त्रास

लाखनी 2:
लाखनी हे तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण. तालुकयातील नागरिक लहान – मोठ्या कामाकरिता लाखांनी शहरात येत असतात. शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर उड्डान पुलाचे बांधकाम जेएमसी कंपनी कडून सुरु आहे. बांधकामाकरिता महामार्गाच्या मध्यभागातून दोन्ही बाजूने सुरक्षा कठडे लावण्यात आले. यामुळे एकेरी वाहतूक सुरु आहे. शहरातील सर्विस रोड वर अतिक्रमण मोठ्या प्रमाणात केले आहे. त्यामुळे स्थानिक व शहराच्या बाहेर जाणारी वाहतूक एकाच मार्गाने होत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर रहदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
पावसाळ्यात सर्विस रोड वरून वाहतूक सुरु करण्यात आली होती त्यामुळे सर्विस रोड च्या सुरुवातीपासुन ते सिंधीलाइन पर्यंत जाणारा सर्विस रोड पूर्णपणे उखडला असून त्यामुळे सर्विस रोड वर अपघाताचे प्रमाण वाढले असुन तिथून जाणाऱ्या वाहतुकीमुळे नागरिकांना धुळीचा त्रास मोठ्या प्रमाणात होत आहे.दररोज किरकोळ अपघात होत आहेत. लाखनी बाजारपेठ कापडा साठी प्रसिध्द असून बाजारपेठेत नागरिकांची गर्दी वाढली आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाश्यांच्या सोयीकरिता बस सुविधा सुरु आहे. लाखनी शहरात एस. टी. महामंडळाच्या बसने प्रवास करणारे प्रवासी संख्या अधिक आहे. त्याचप्रमाणे वर्दळीचे ठिकाण म्हणून लाखनी ओळखले जाते. लाखानित शिंगोरी पासून तसेच मुंडीपार पासून हजारच्या संखेने विध्यार्थी विद्यार्जन करण्यासाठी येत असतात. तसेच दररोज लाखनी वरून ये जा करणारे कर्मचारी वर्ग देखील प्रवास करीत असतात. त्यामुळे शाळा भरण्याच्या वेळी व शाळा सुटण्याच्या वेळी एस टी बस च्या फेर्या वाढविण्याची गरज आहे. तसेच विद्यार्थी व प्रवास्यांना सोडण्यासाठी एस टी बस राष्ट्रीय महामार्गाने जात असल्यामुळे मागे असणारी पूर्ण वाहतूक प्रवासी उतरत व चढत पर्यंत थांबून राहते. कधी कधी एकावेळी २-३ बस येतात त्यावेळी लांबच लांब वाहनाची रंग लागते. त्यामुळे एस टी बस ची वाहतूक सर्विस रोड ने होणे गरजेचे आहे. तसेच रस्ता ओलांडताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्याचप्रमाणे लाखनी येथे भरणारा आठवडी बाजार राष्ट्रीय महामार्गाच्या सर्विस रोड वर भरत असतो. त्यामुळे नागरिक मिळेल तिथे आपल्या गाड्या पार्कीग करून आठवडी बाजारात जात आहेत. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. सध्या बाजार भरण्याच्या परिसरात लाखनी चे न्यायालय आल्याने पोलीस विभागाची मोठ्या प्रमाणत दम छाक होत असते. न्यायालयात येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्याची पार्किंग नवीन न्यायालयाच्या इमारतीच्या मागे असून नागरिक अगदी समोरच ठेवत असल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. तसेच सिंधी लाईन चौक हे शहराचे मध्यवर्ती ठिकाण असून प्रसिद्ध कापडाची बाजारपेठ असल्यामुळे नेहमीच हा परिसर गजबजलेला असतो.
सध्या राष्ट्रीय महामार्गावर उड्डान पुलाचे बांधकाम सुरु असल्यामुळे महामार्गाच्या मध्यभागातून दोन्ही बाजूने सुरक्षा कठडे लावण्यात आले आहे. सर्विस रोड वर अतिक्रमण मोठ्या प्रमाणात स्थानिक व्यापार्यांनी केले असल्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत असते. वाहतुकीच्या त्रासापासून वाचण्यासाठी नागरिक महामार्गाने ट्रक वा इतर वाहनाच्या बाजूने रस्ता काढत मार्गक्रमन करीत असतात त्यामध्ये मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.