25.5 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home शैक्षणिक शिष्यवृत्तीचे अर्ज १५ नोव्हेंबरपर्यंत महाडीबीटी पोर्टलवर भरण्याचे आवाहन

शिष्यवृत्तीचे अर्ज १५ नोव्हेंबरपर्यंत महाडीबीटी पोर्टलवर भरण्याचे आवाहन

0
28

वाशिम, दि. ०५ : सन २०१८-१९ पासून महाराष्ट्र शासनातर्फे सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी https://mahadbtmahait.gov.in हे पोर्टल माहिती व तंत्रज्ञाना यांच्यातर्फे कार्यरत करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षाकरिता अनुसूचित जातीविजाभजइमाव आणि विमाप्र या प्रवर्गासाठी राबविण्यात येणाऱ्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीशिक्षण फीपरीक्षा फी योजना व इतर ऑनलाईन झालेल्या योजनांकरिता ऑनलाईन अर्ज भरण्यास १५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत मुदत  देण्यात आला आहे.

तरी त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व प्राचार्यमुख्याध्यापक यांनी आपल्या स्तरावरून सर्व संबंधित पात्र विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरण्याविषयी अवगत करावे. तसेच महाडीबीटी पोर्टल https://dbtworkflow.mahaonline.gov.in या पडताळणी संकेतस्थळावर देण्यात आलेल्या कालावधीनुसार संबंधित महाविद्यालयांनी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीशिक्षण फीपरीक्षा फी योजना व इतर ऑनलाईन झालेल्या योजनांकरिता ऑनलाईन प्राप्त झालेले सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज शासन निर्णयानुसार पडताळणी करून पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज सादर संकेतस्थळावर दिलेल्या कालावधीत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, वाशिम यांना ऑनलाईन पाठवावेत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.