गोरेगाव,दि.09:-गोरेगाव तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन शुक्रवारी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले.यावेळी डॉ झामसिंग बघेले, पी जी कटरे, नामदेव किरसान,सि टी चौधरी,डेमेंद्र रहांगडाले,ज्योतीताई वाल्दे, चंद्रशेखर बोपचे,जयतुराबाई चव्हाण, ललिता बहेकार, राहुल कटरे, मनोज वालदे, ओमप्रकाश कटरे उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात अवकाळी पावसामुळे धानपीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून धान पाखर होवून काळा पडला आहे त्यामुळे तो धान आधारभूत किंमत धान खरेदी केंद्रात घेण्यात यावे. अवकाळी पावसाने खराब झालेल्या धानाचे पंचनामा करून एकरी ३० हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, आधारभूत किंमत धान खरेदी केंद्रावर प्रती क्विंटल ४ हजार रुपये धान खरेदी करण्यात यावे व सरसकट बोनस जाहीर करण्यात यावे ,जिवनाश्यक वस्तुचे भाव वाढलेले आहेत ते कमी करुन जीएसटी रद्द करण्यात यावी , पेट्रोल डिझेल चे भाव कमी करण्यात यावे, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावे, शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करण्यात यावे, शेतकऱ्यांना धानपीकाची विमा कंपनी कडुन नुकसानीचा मोबदला देण्यात यावे, गोरेगाव तालुक्याला ओला दुष्काळ तालुका घोषीत करा, ग्रामिण रुग्णालयातील रिक्त वैद्यकीय अधिकारी यांची पदे भरण्यात यावी अश्या प्रकारची मागणी करण्यात आली आहे.





