25 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home विदर्भ बाराभाटी आदिवासी सहकारी संस्थेचे धान खरेदी केंद्र सुरू

बाराभाटी आदिवासी सहकारी संस्थेचे धान खरेदी केंद्र सुरू

0
36

अर्जुनी मोर,दि.21 : तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्था बाराभाटी या संस्थेची हमीभाव धान खरेदी काही कारणास्तव सुरू झाली नव्हती. त्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांची गैरसोय होत होती. त्यामुळे १९ नोव्हेंबर पयर्ंत धान खरेदी केंद्र सुरू न झाल्यास २0 नोव्हेंबर रोजी धडक मोर्चा काढण्याचा इशारा शेतकर्‍यांनी संबंधितांना दिला होता. तसेच या विभागाचे नवनिर्वाचित आ. मनोहर चंद्रिकापुरे यांनाही निवेदन दिले होते. दरम्यान, आ. चंद्रिकापुरे यांनी शेतकर्‍यांची रास्त मागणी लक्षात घेत वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा केल्यावर  २0 नोव्हेंबरला संस्थेतर्फे धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी मोर्चा स्थगीत केला.
संस्थेने धान खरेदी केंद्र सुरू केल्यावर आ. मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते काटापूजन करुन धान खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. अध्यक्षस्थानी पंस सभापती अरविंद शिवणकर होते. यावेळी जि. प. सदस्य किशोर तरोणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वेंकट खोबरागडे, सरपंच अनिता खोब्रागडे, उपसरपंच र्शावण मेंढे, आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक आर. बी. पाटील, संस्थेचे अध्यक्ष तुलाराम मारगाये, उपाध्यक्ष लैलेश शिवणकर, संचालक पृथ्वीराज खोब्रागडे, पुनाजी नाईक, प्यारेलाल रंगारी, चरण घासले, निळकंठ किरसान, केवळराम नाईक, सुरेश परशुरामकर, कचरू मेर्शाम, नीळकंठ भोयर, संस्था सचिव एल. बी. बागडे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी उपस्थित शेतकड्ढयांना मार्गदर्शन करताना आ. चंद्रिकापुरे म्हणाले, शेतकर्‍यावर ज्या काही अडचणी येतील त्याचे निराकरण त्वरित करुन न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करु. यापुढे शेतकर्‍यांचा आवाज दाबण्याचा किंवा वेठीस धरणार्‍यांची गय केली जाणार नाही. दरम्यान, उशिरा का होईना धान खरेदी केंद्र सुरू झाल्याने या परिसरातील शेतकर्‍यांनी आ. चंद्रिकापुरे यांचे आभार मानून आनंद व्यक्त केला. तसेच आदिवासी विकास कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या वतीने आ. मनोहर चंद्रिकापुरे यांचा संस्था अध्यक्ष तुलाराम मारगाये, उपाध्यक्ष लैलेश शिवनकर यांचे हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.