24.5 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home विदर्भ कोहमारा दुग्ध संकलन केंद्रानंतर गोंदियातील केंद्र बंद होण्याच्या मार्गावर

कोहमारा दुग्ध संकलन केंद्रानंतर गोंदियातील केंद्र बंद होण्याच्या मार्गावर

0
53
gondia

गोंदिया,दि.२१ः-गोंदिया जिल्ह्यात सुरु असलेले शासकीय दुध संकलन केंद्र बंद पडण्याच्या मार्गावर असून कोहमारा येथील शासकीय दुध संकलन केंद्र गेल्या १० दिवसापुर्वीच बंद पडल्याने त्या भागातील दुध उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.तर दुसरीकडे गोंदियातील शासकीय दुध संकलन केंद्र सुध्दा बंद करण्याचे आदेश शासनाने दिल्याचे वृत्त समोर आले आहे.विशेष म्हणजे या दुध संकलन केंद्रात दुधाचा पुरवठा करण्यासाठी जिल्ह्यात दुध सहकारी संघ २००४ मध्ये अस्तित्वात आला.हा संघ अस्तित्वात येऊन १५ वर्ष झाली असून अध्यक्षपद हे शिवसेनेकडे तब्बल १५ वर्षापासून आहे.परंतु या संघाने शेतकरी व संघाचा विकास साधला असे चित्र नसून या संघाची परिस्थिती सुध्दा बिकट झाली आहे.कर्मचारी अधिकारी यांचे वेतन द्यायलाही पुरेसा पैसा नसल्याचे वृत्त असून दुध उत्पादक शेतकèयांचे २०१७ पासूनचे लाखो रुपयाचे देयके संघाकडे प्रलqबत असल्याने हे शेतकरी न्यायालयापर्यंत पोचले आहेत.त्यातच दुध संघाकडे आजच्या घडीला फक्त ३०० ते ५०० लीटर दुधाची आवक असल्याने दुध वाहून नेणाèया गाडीचा डिझेलचाही खर्च पेलवणारा नसल्याचे बोलले जाते.त्यातच संकलीत होणारा दुध कमी असल्याचे कारण पुढे करुन दुग्ध सहकारी संस्थाच्या आयुक्तांनी शासकीय दुध संकलन केंद्रच बंद करण्याचा निर्णय काही दिवसापुर्वी घेतला असून तसे आदेश कधीही गोंदियात पोचणार आहे.जिल्ह्यात जिल्हा दुग्ध संघाच्यावतीने गोंदिया,तिरोडा,आमगाव ,सालेकसा येथील दुध गोंदियात तर कोहमारा येथील केंद्रात अर्जुनी मोरगाव,सडक अर्जुनी,गोरेगाव व देवरी येथील संस्थेच्या माध्यमातून दूध खरेदी करण्यात येत होते.काही दिवसापुर्वी कोहमारा येथील केंद्र बंद करण्यात आले.तर आता गोंदियातील केंद्रही परवडत नसल्याच्या कारणांने बंद करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.त्यामुळे खासगी डेयरीमध्ये शेतकèयाला दुध विकण्याची वेळ येणार आहे.त्यातच २०१७ पासून सुमारे ८ हजार शेतकèयांचे ५० लाख रुपये जे संघाकडे थकीत आहेत,ते मिळविण्यासाठी शेतकरी जिल्हाधिकारी,पोलीस अधिक्षकासंह इतरांना निवेदन देऊ लागले आहेत.