30.5 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ तुमसर पं. स. उपसभापती विरोधात अविश्वास ठराव पारित

तुमसर पं. स. उपसभापती विरोधात अविश्वास ठराव पारित

0
45

तुमसर,दि.21ः- येथील पंचायत समितीच्या उपसभापती सुप्रिया रहांगडाले यांच्या विरोधातील अविश्वास ठरावावर मतदान घेण्यासाठी बुधवारला पंचायत समितीच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर व खंड विकास अधिकारी मिलींद बडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या सभेत १६ सदस्यांनी मतदानाच्या बाजुने मतदान केल्याने ठराव पारित करण्यात आला. दोन वर्षाच्या आधी तुमसर पंचायत समिती उपसभापती पदाची निवडणुक घेण्यात आली होती.

राष्ट्रवादीच्या सुप्रिया किशोर राहांगडाले यांना उपसभापतीपदावर बहुमताने विराजमान करून राष्ट्रवादीच्या गोटात सुरूंग लावला होता. ही खेळी त्यावेळी त्यांची ‘सर्जिकल स्ट्राईक‘ या नावाने चांगलीच गाजली होती. सध्या तुमसर पंचायत समितीमध्ये भाजपाचे ९, शिवसेना २, राष्ट्रवादी ७, काँग्रेस १, अपक्ष १ असे एकूण २० सदस्यांचे संख्याबळ आहे. यात भाजपा व शिवसेनेला स्पष्ट बहुमत आहे. मात्र, सध्या भाजपा व राष्ट्रवादी पक्षाच्या सदस्यांची हातमिळवणी झाल्याचे दिसून येत आहे. सदस्यांना विश्वासात न घेता मनमर्जीने कामे करणे, मासिक सभेच्या दिवसी येणे, उर्वरीत दिवसी कार्यालयात हजर न राहणे या कारणावरून १६ सदस्यांच्या सहीने उपसभापती सुप्रीया राहांगडाले यांच्या विरूद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आलेला होता. उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी सभा बोलाविण्यात आली. सभेला उपसभापती सुप्रिया रहांगडाले यांच्यासह चार सदस्य अनुपस्थित होते. त्यामुळे १६ विरुद्ध ० मताने हा अविश्वास ठराव पारीत झाला.

blank