वाशिम, दि. २१ : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष ए. जी. बिलोलीकर यांच्या निर्देशानुसार जिल्हा पोलीस मुख्यालयात अटकपूर्व जमीन, अटक केलेल्या व्यक्तीस जमीन व तपासी अधिकाऱ्यांची कर्तव्ये या विषयावर कार्यशाळेचे २० नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पी. पी. देशपांडे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते.कार्यशाळेत विधी अधिकारी सविता खोटरे, विधिज्ञ दि. आर. पडघान, जी. व्ही. गायकवाड यांनी अटकपूर्व, अटक केलेल्या व्यक्तीस जमीन आणि तपासी अधिकारी यांची कर्तव्ये याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी तपासी अधिकाऱ्यांच्या शंकांचे यावेळी निरसन करण्यात आले. तसेच न्यायालयात प्रकरणे दाखल करताना सरकार पक्षाच्यावतीने काय दक्षता घ्यावी, याबाबत देखील त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.





