26.9 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home शैक्षणिक माॅडेल कान्व्हेंटमध्ये विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन वर्ग

माॅडेल कान्व्हेंटमध्ये विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन वर्ग

0
36

गोरेगाव,दि.22ः- येथील मॉडेल कॉन्व्हेंट आणि सायन्स ज्युनिअर गोरेगाव येथे वर्ग 10 च्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयाच्या मार्गदर्शन वर्गाचे आयोजन(दि.18) केले गेले होते.या वर्गाला मार्गदर्शनासाठी के.एस.वैद्य उपस्थित होते. त्यानी विद्यार्थ्यानी कश्याप्रकारे मराठी विषयाचा अभ्यास कसा करावा तसेच कश्याप्रकारे बोर्डाच्या परीक्षेत मराठी विषयाचे उत्तरे लिहावे अश्या अनेक मुदयावर प्रकाश टाकला. शाळेचे संस्थापक आर.डी.कटरे यांनी देखील विद्यार्थ्यानी लवकरच येणाऱ्या बोर्डाच्या परिक्षेला कश्याप्रकारे मनात कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता कसे समोरं जाता येईल यावर मार्गदर्शन केले.तसेच विद्यार्थ्यानी परीक्षेत चांगले यश संपादन करुन आई वडील तसेच शाळेचे नाव उंच करावे असे आवाहन केले.यावेळी फाये ,आर,एम,कटरे यांनी मार्गदर्शन वर्गाच्या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

blank