मुंबई,दि.23 : एकीकडे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार स्थापन करण्याच्या घडामोडी सुरू असताना महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर गोसेखुर्द बांधकाम घोटाळा,ईडी,विमानतळ घोटाळ्यासह इतर आरोप असल्याने राष्ट्रवादीने भाजपसोबत हातमिळवणी करावी यासाठी राज्यसभेचे खासदार पुढाकार घेत होते,त्यात राष्ट्रवादीला यश आले असून आपल्यावरील भ्रष्टाचाराची चौकशी थांबविण्यासाठीच भाजपसोबत सत्तेत हातमिळवणी केल्याची चर्चा सुरु झाली आहे.





