24.3 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home शैक्षणिक तीन दिवसांचे वेतन द्या; नंतर स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाची निवडणूक घ्या

तीन दिवसांचे वेतन द्या; नंतर स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाची निवडणूक घ्या

0
41

गोंदिया,दि. २२ः नोव्हेंबर कर्मचाèयांच्या समस्या व मागण्यांच्या अनुषंगाने विविध संघटनांच्या माध्यमातून राज्यव्यापी संप करण्यात आला होता. त्यामुळे संपकाळातील तीन दिवसांचे वेतन अद्यापही प्राप्त झालेले नाही. संपकालीन तीन दिवसांचे वेतन द्या व नंतरच स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाची निवडणूक घ्या, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती गोंदिया  व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती गोंदियाच्या वतीने शिक्षणाधिकारी व शिक्षण सभापती यांना करण्यात आली आहे.वाय.एस.भगत जिल्हाकार्यवाह यांनी मागील वर्षी निवडणूक न घेता एक वर्ष कालावधी वाढवली.६ वर्ष कालावधी होऊनही निवडणूक आजतारखेपर्यंत घेतली नाही.त्यामुळे या मंडळाला त्वरीत बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली.

संपकालीन वेतन मिळेपर्यंत निवडणुकीवर शिक्षक समितीचा बहिष्कार राहील, अशी भूमिका घेत शिक्षणाधिकाèयांशी चर्चा करून निवेदन देण्यात आले. या संदर्भात शिक्षणाधिकाèयांनी शिक्षण सभापतींशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.स्वदेशी खेळांचे नियम धाब्यावर बसवून २०१८ मध्ये घ्यावयाची निवडणूक २०१९ मध्ये घेणे,आजीवन सदस्य व संघटनेच्या प्रमुख पदाधिकाèयांना विश्वासात न घेणे,आदी आरोप करण्यात आले आहेत.तीन दिवसांचे संपकालीन वेतन अदा करून सर्व प्रमुख संघटनांचे पदाधिकारी व आजीवन सदस्यांची बैठक घेऊन स्वदेशीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतरच निवडणूक घेण्यात यावी, तोपर्यंत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे ‘वेतन द्या व नंतर निवडणूक घ्या,ङ्क ही भूमिका शिक्षणाधिकाèयांसमोर मांडली गेली आहे. त्यामुळे शिक्षक समितीच्या पदाधिकाèयांना व जिल्ह्यातील शिक्षकांना समितीतर्फे आवाहन करण्यात आले आहे की, जोपर्यंत वेतनाचा प्रश्न निकाली निघत नाही तोपर्यंत कुठल्याही स्वदेशीच्या निवडणूक प्रक्रियेत भाग घेऊ नये. शिक्षणाधिकाèयांच्या दालनात झालेल्या चर्चेमध्ये उच्च परीक्षा परवानगी व स्थायीची यादी लवकरच प्रकाशित करण्याचे आश्वासन देण्यात आले. निवडश्रेणी ११३ प्रकरणे व चटोपाध्यायची ९६ प्रकरणे वित्त विभागातून लवकरच मंजूर करण्यात येतील, अशा प्रकारचे आश्वासन देण्यात आले. विषय शिक्षक, उच्चश्रेणी मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, हायस्कूल शिक्षकांची रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले. विषय शिक्षकांना नियमाप्रमाणे लवकरच वेतनश्रेणी लावण्यात येईल, असे आश्वासन शिक्षणाधिकाèयांनी दिले. यासह शिक्षकांच्या इतर समस्या मार्गी लावण्यासंदर्भात चर्चा करून सर्व प्रकरणे तत्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले.

यावेळी शामराव चन्ने विभागीय उपाध्यक्ष, राज्य महिला उपाध्यक्ष दमयंती वैद्य, जिल्हाध्यक्ष राजानंद वैद्य, सौ.प्राजक्ता रणदिवे,जिल्हा सरचिटणीस हरिराम येळणे ,सौ.जयश्री सिरसाटे,नेते नेतराम बिजेवार,सौ.गौरी रायकवार,उपाध्यक्ष पी.के.खोब्रागडे, सौ.संगिता घासले,जिल्हा सहसचिव मनोज गणवीर कोषाध्यक्ष भिमराव बन्सोड, प्रसिध्दी प्रमुख प्रमोद बघेले , प्रमुख संघटक उत्तम टेंभरे,सौ.रेखा बिसेन, तालुका गोंदिया अध्यक्ष- एस.एम.बिसेन,सौ.विजयलता पोहरकर, सरचिटणीस-एस.पी.पटले,सौ.कलावती कोल्हटकर ,विजय नेवारे,एच.पी.कटरे,एक.के.वंजारी,मुक्तानंद ऊईके,दशेंद्र रहांगडाले,पी.एन.फंदे, हेमराज शहारे, रविंद्र शहारे,आर.आर.अगडे, यासह बहुसंख्येने शिक्षक पदाधिकारी उपस्थित होते.तसेच शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष मनोज दीक्षित, जिल्हा सरचिटणवीस एल. यु. खोब्रागडे,उपाध्यक्ष किशोर डोंगरवार, जिल्हा सहसचिव संदीप तिडके, पी. आर. पारधी, एन. बी. बिसेन, सुरेश कश्यप,रोशन मस्करे, गजानन पाटणकर, डी.व्ही. बहेकार, संदीप मेश्राम यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

blank