36 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ ग्रंथालयांसाठी असमान निधी योजना ऑनलाईन पध्दतीने प्रस्ताव मागविले

ग्रंथालयांसाठी असमान निधी योजना ऑनलाईन पध्दतीने प्रस्ताव मागविले

0
36

 गोंदिया,दि.23. : भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या असमान निधी योजनेअंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगिण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना राबविण्यात येतात. सन 2019-20 पासून असमान निधी योजनांसाठीचे विविध प्रस्ताव www.rrrlf.gov.in या प्रतिष्ठानच्या संकेतस्थळाद्वारे Online पध्दतीने सादर करण्याबाबत प्रतिष्ठानकडून निर्देश देण्यात आले आहेत.असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी Online पध्दतीने अर्ज कसा करावा याबाबत www.rrrlf.gov.in या संकेतस्‍थळावरील असमान निधी योजना या खिडकीखाली देण्यात आलेल्या User guide for applying online assistance यावर सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यात आले आहे.

वरील मार्गदर्शक सूचनांनुसार इच्छुक शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी आपणास आवश्यक असलेल्या असमान निधी योजनेचे प्रस्ताव वरील संकेतस्थळावरुन उपलब्ध करुन दिलेल्या सूचनांनुसार Online पध्दतीने 7 डिसेंबर 2019 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अपलोड करावेत. तसेच सदर अर्जाची प्रिंट काढून अपलोड केलेल्या आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव चार प्रतित संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास 11 डिसेंबर 2019 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत सादर करावेत. तदनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार आहे.

पुढे दिलेल्या योजनांचा लाभ राज्यातील इच्छुक शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना घेता येईल. असमान निधी योजना सन 2019-20 साठी ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन सामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व इमारत विस्तार यासाठी असमान निधीतून अर्थसहाय्य. राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान कोपरा विकसीत करण्यासाठी अर्थसहाय्य. महोत्सवी वर्ष जसे 50/60/75/100/125/150 वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य. राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय्य. बाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय बाल कोपरा स्थापन करण्याकरीता अर्थसहाय्य.

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनांबाबत इच्छुकांनी अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, तसेच प्रतिष्ठानचे www.rrrlf.gov.in हे संकेतस्थळ पहावे. वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी सादर करण्यात येणारा अर्ज हा Online पध्दतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रे अपलोड करुन इंग्रजी/हिंदी भाषेत भरावा. असे आवाहन सुभाष राठोड, ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगर भवन, मुंबई यांनी राज्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना केले आहे.

blank