आमगांव,दि.23:- तालुक्यातील पंचायत समिती आमगांव येथे राज्य महिला आयोग, मुबंईच्या सर्वसम्मतींने सहारा महिला समुपदेशन केंद्राचे ( तक्रार निवारण )उद्घाटन पंचायत समितीचे उपसभापती जयप्रकाश शिवनकर यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमगांव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुहास चौहाण होते.प्रमुख अतिथी म्हणून अधीक्षक एन.एम.कुंटे,पर्यवेक्षिका श्रीमती गौर, श्रीमती पाटील तर राज्य महिला आयोगच्या जिल्हा समन्वयक रजनी रामटेके उपस्थित होत्या.या तक्रार निवारण केंद्रात
महिलांच्या विविध समस्या उदा. कौटुंबिक कलह, मारहाण, पति- पत्नीचे भांडण, हुंडाबळी प्रकरण, विभक्त कुटुंब पद्धती, स्त्रियांना घरातून बाहेर काढ़णे,घटस्फोट,पोटगी, मालमत्ता हक्क, लैंगिक शोषण, बलात्कार, पळवून नेणे, शारिरीक व मानसिक छळ अश्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासंबधी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व्दीप करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. संचालन रजनी रामटेके (अध्यक्ष- उषामल महिला संस्था, आमगांव ) तर आभार सूचित ऊके (समुपदेशक – सहारा महिला समुपदेशन केंद्र, पंचायत समिति, आमगांव ) यानी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता धीरज मेश्राम,लक्ष्मीकांत ड़हाटे,रुपाली पटले, दीक्षा बिसेन, प्रशांत टेंभुर्णे आदिनी अथक प्रयत्न केले.





