25.1 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home विदर्भ पवार महासभेचे गाव ते जिल्हापातळीवर होणार विस्तार-इंजि.टेंभरे

पवार महासभेचे गाव ते जिल्हापातळीवर होणार विस्तार-इंजि.टेंभरे

0
28

गोंदिया,दि.25ः- राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभेने विस्तार करण्याच्या दृष्टीने गावपातळीपर्यंत पोचण्याचा निर्धार केला असून गाव ते जिल्हापातळीवर संघटन निर्मितीच्या उद्देशाने रविवार 24 नोव्हेंबरला तालुक्यातील सुखदेवटोली स्थित कबीर आश्रमात बैठक पार पडली.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय पवार महासभेचे अध्यक्ष इंजि. मुरलीधर टेंभरे होते.प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय उपाध्यक्ष उमेश देशमुख,राष्ट्रीय संघटन सचीव खेमेन्द्र कटरे, जनसंवाद सचिव डाँ. संजीव रहांगडाले,युवा अध्यक्ष व राजाभोज स्मारक समिती बैहरचे अध्यक्ष प्रल्हाद पटले,भंडारा पोवार समाज संघटन अध्यक्ष चेतन भैरम,पवार महासभा सदस्य अँड. आर.ओ. कटरे, बालाघाट संघटनेचे अध्यक्ष खिरसागर पारधी,आर एल.राणा,गोंदिया पवार प्रगतीशील मंचचे सदस्य महेंद्र बिसेन,माजी जिल्हा परिषद सदस्य संजय टेंभरे,अशोक हरिणखेडे,भंडारा जिल्हा पवार महासभा संघटन अध्यक्ष विश्वजीत फुंडे,मोहाडी तुमसर तालुका अध्यक्ष हैसोक शरणागत,लालू कटरे, राजेश अंबुले,डी.डी.पटले,आर.एच.पटले आदी मान्यवर उपस्थित होते.

या बैठकीत गोंदिया जिल्ह्यात गावपातळीवर महासभेचे संघटन तयार करुन महासभेची सभासद संख्या वाढविण्यासोबतच गाव ते जिल्हा पातळीवर संघटन तयार करण्यासंदर्भात विचार विनिमय करुन त्या दृष्टीने काम करण्याचे नियोजन ठरविण्यात आले.सोबतच येत्या 28 व 29 जानेवारीला मध्यप्रदेशातील बैहर येथे महासभेचे पहिल्या दिवशी राष्ट्रीय अधिवेशन व दुसर्या दिवशी चक्रवर्ती राजा भोज यांच्या भव्य प्रतिमेचे लोकार्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.त्या कार्यक्रमाला प्रत्येक गावातून समाज बांधवाना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.तसेच यापुर्वी महासभेचे 5 वर्षातून एकदाच अधिवेशन व्हायचे,ते सुध्दा निवडणुकीच्या काळात मात्र आता त्यात बदल करुन दरवर्षी वेगवेगळ्या राज्यातील एका जिल्ह्यात महासभेचे अधिवेशन आयोजित करण्याचे नियोजन झाल्याची माहिती महासभेचे अध्यक्ष इंजि.मुरलीधऱ टेंभरे यांनी यावेळी दिली.उमेश देशमुख यांनी बैहर येथील कार्यक्रमासंदर्भात मार्गदर्शन केले तर संघटन सचिव खेमेंद्र कटरे यांनी पवार समाजाला जागृत करुन सविंधानिक हक्काच्या लढ्यात सहभागी होण्यासाठी जागृत होण्याची गरज आहे.तसेच आपली सामाजिक शक्तीचे परिचय करुन देण्यासाठी निवडणुकामध्ये मतभेद बाजुला सारणे आवश्यक असल्याचे विचार व्यक्त केले.यावेळी भंडारा पोवार समाज संघटनेचे अध्यक्ष चेतन भैरम यांनी 19 जानेवारी 2020 रोजी भंडारा येथे आयोजित पोवार समाज सम्मेलनात सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन केले.सोबतच शिक्षणाकडे लक्ष देऊन विवाहसमारंभातील खर्चावर नियंत्रण करुन तो खर्च उच्च शिक्षणावर खर्च करण्याचे नियोजन समाजाने केल्यास समाजात शैक्षणिक क्रांती निर्माण होईल असे इंजि.टेंभरे यांनी सांगितले.प्रल्हाद पटले यांनीही बैहर येथील कार्यक्रमाच्या नियोजनाची सविस्तर माहिती देत यावेळी प्रकाशित होणार्या स्मरणिकेसाठी जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करण्याचे आवाहन केले.या बैठकीत गोंदिया जिल्ह्यात गावपातळीवर संघटन तयार करण्यासाठी प्रभारी जिल्हाप्रमुख म्हणून सेवानिवृत्त उपवनसरंक्षक डी.डी.पटले यांची निवड करण्यात आली.सोबतच प्रभारी सचिव म्हणून आर.एम.पटले यांची निवड कऱण्यात आली.बैठकिचे संचानल नरेंद्र गौतम यांनी केले,तर आभार अॅड.रुपेंद्र कटरे यांनी मानले आयोजनासाठी रोशनभाऊ बोपचे,धनजंय रिनायत,विक्की बघेले,राजेश अंबुले,महेंद्र पारधी,डाॅ.भोजराज बिसेन,शंकरभाऊ बोपचे,दिलीप पटले,सुधीर रहागंडाले,निरज हरिणखेडे,सुनिल टेंभरे,टेकचंद कटरे,विजय कटरे,आनंद कटरे,हौसलाल कटरे,मुन्नालाल राणे,शंकरलाल बोपचे,माणिक तुरकर,डाॅ.मितेश तुरकर,कुंदनलाल राणे,देवलाल पटले,संजय गौतम,योगेंद्र बिसेन आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

blank