24.6 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home Top News हँड ग्रेनेडच्या स्फोटात एकाचा मृत्यू; दोघे जखमी

हँड ग्रेनेडच्या स्फोटात एकाचा मृत्यू; दोघे जखमी

0
30

गडचिरोली,ता.२५: एटापल्ली तालुक्यातील कांदोळी(बुर्गी) गावातील एका शेतात आज दुपारी हँड ग्रेनेडचा स्फोट झाल्याने एक युवक ठार, तर दोन जण जखमी झाले. लूला रानू मडावी(२५) असे मृतकाचे, तर प्रकाश रानू मडावी(३०) व रमेश करपा मडावी (२१) अशी जखमींची नावे आहेत.लुला मडावी हा आज आपल्या शेतात धान काढणीकरिता गेला होता. यावेळी त्याला शेतात एक हँड ग्रेनेड सापडला. तो निकामी असल्याचे समजून त्याने तो शेतातील झोपडीत नेऊन ठेवला. काही वेळाने लुला मडावीचे दोन भाऊ शेतात आले. ते देखील धान काढणी करु लागले. एवढ्यात अचानक झोपडीतील ग्रेनेडचा स्फोट झाला. त्यात लुला मडावीचा जागीच मृत्यू झाला. त्याचे दोन भाऊ प्रकाश व रमेश हे जखमी झाले. दोघांच्याही दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.२०१४ मध्ये कांदोळी(बुर्गी)येथे पोलिस व नक्षल्यांमध्ये चकमक उडाली होती. त्यावेळी हा ग्रेनेड नक्षल्यांनी तेथे फेकला असावा, असा अंदाज आहे.

blank