25.5 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home Top News मुख्यमंत्री फडणवीस यांची राजीनाम्याची घोषणा

मुख्यमंत्री फडणवीस यांची राजीनाम्याची घोषणा

0
33

 मुंबई,दि.26ः- महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा भूकंप झाला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा पत्रकारपरिषदेत मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी दिला.पत्रकार परिषदेत नव्या येणार्या सरकारला शुभेच्छा देत शिवसेनेने सत्तेसाठी कशी लाचारी पत्करली यावर टिका केली.तसेच अजित पवार यांनी न्यायालयाच्या निर्णयानंतर आपल्याकडे संख्याबळ नसल्याचे सांगत राजीनामा दिला.त्यानंतर आम्ही विचार केला आणि कुठलाही घोडाबाजार न करता संख्याबळ नसल्याने पत्रकार परिषदेनंतर लगेच राज्यपाल यांची भेट घेऊन राजीनामा देणार असल्याचे फडणवीस म्हणाले.