अंजनशिंगी,दि.26ः- येथील कान्होजीबाबा कनिष्ठ महाविद्याल अंजनशिंगी व एक्सल स्टडी युट्युब चॅनलच्या संयुक्त विद्यमाने आज संविधान दिनानिमित्याने एक दिवसीय स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली.सुरवातीला डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पन करण्यात आले.अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक मनोहरराव कोरडे हे होते.प्रमुख अतिथी प्रा.समिर कळसकर,प्रा.उज्वला चांबटकर, प्रमुख व्याख्याते प्रा.अजय ठाकरे यांनी स्पर्धापरीक्षा व अभ्यास करण्याची कौशल्ये,एमपीएससी ,युपीएससी,स्टाफ सिलेक्शन,रेल्वे ,पोष्ट इ. विषयी स्लाईड क्लिप द्वारे मार्गदर्शन केले.ग्रामीण भागातील विद्यार्थांचा स्पर्धा परिक्षाकडे कल वाढत चालला आहे. त्यासाठी प्रसारमाध्यमांचा उपयोग करणे अत्यावश्यक असून दररोज विविध वर्तमानपत्राचे वाचण,इलेक्ट्रॉनिक मिडिया वरील अभ्यास मटेरिअल वाचणे आवश्यक आहे. याप्रसंगी स्पर्धापरीक्षा तयारी करणाऱ्या साठी युट्युब चॅनल सुरु करण्यात आले. excelstudy या वरुन स्पर्धा व्हिडिओ पहायला मिळणार आहे.या स्थुत्य उपक्रमाला प्राचार्य बी.एम गाढवे व इतर शिक्षकांनी शुभेच्छा दिल्या.सुत्रसंचालन प्रा.अतुल ठाकरे,प्रास्तविक प्रा.दिपक अंबरते यांनी केले.आभार प्रा.मंजुषा बुरिले यांनी मानले.अंजनशिंगी,ढाकुलगाव, अशोकनगर, गुंजी,गव्हा,दुर्गवाडा, धारवाडा,अंजनवती येथिल विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.




