36 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ अमरावती शिक्षक मतदारसंघ प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध ९ डिसेंबरपर्यंत नाव नोंदविता येणार

अमरावती शिक्षक मतदारसंघ प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध ९ डिसेंबरपर्यंत नाव नोंदविता येणार

0
57

वाशिम, दि. २६ : भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघ मतदार नोंदणी कार्यक्रमानुसार १ ऑक्टोंबर २०१९ पासून पुनरीक्षण कार्यक्रम सुरु झाला आहे. त्यानुसर १५ व २५ ऑक्टोंबर रोजी वर्तमानपत्रात नोटीस प्रसिद्ध करण्यात आली. ६ नोव्हेंबर २०१९ पर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात आल्या. त्यानंतर हस्तलिखित तयार करून १९ नोव्हेंबर २०१९ पर्यंत प्रारूप मतदार याद्यांची छपाई करण्यात आली. या प्रारूप याद्या २३ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय व तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर लावून प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

९ डिसेंबर २०१९ पर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. त्यामुळे शिक्षक मतदार यादीमध्ये नाव नोंदणी न केलेल्या शिक्षकांना ९ डिसेंबरपर्यंत मतदार यादीत नाव नोंदविता येणार आहे. २६ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती निकाली कडून पुरवणी यादी तयार करणे व छपाई करण्यात येईल. त्यानंतर ३० डिसेंबर २०१९ रोजी मतदार याद्यांची अंतिम प्रसिद्धी करण्यात येणार आहे, असे उप जिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन यांनी कळविले आहे.

२३ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये मालेगाव तालुक्यातील ४००रिसोड तालुक्यातील ६४५वाशिम तालुक्यातील ७९०मंगरूळपीर तालुक्यातील ३७६कारंजा तालुक्यातील ५६३ व मानोरा तालुक्यातील २१० अशा एकूण २ हजार ९८४ शिक्षक मतदारांचा समावेश आहे.

blank