गडचिरोली ,दि.27: महाराष्ट्र राज्याचे मा.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तथा कुलपती, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली हे इंद्रधनुष्य 2019 या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी गडचिरोली येथे 2 डिसेंबर रोजी येत आहेत. याबाबत प्रभारी जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे यांनी विद्यापीठ व शासनाच्या विभाग प्रमुखांची नियोजन बैठक घेतली. या बैठकीत नियोजनाबाबत संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या. गोंडवाना विद्यापीठात दि. 2 डिसेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान 17 व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. यासाठी 20 विद्यापीठांमधून जवळपास 800 विद्यार्थी सहभागी होणार आहेत.नियोजन बैठकीला यावेळी निवासी उप जिल्हाधिकारी अनंत वालस्कर, जिल्हा नियोजन अधिकारी टि. एस. तिडके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.ए.जे.रूडे, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, गोरख गायकवाड पोलीस उपअधिक्षक गृह, गोंडवाना विद्यापीठाकडून डॉ.अनिल चिताडे, डॉ.नरेश मडावी, डॉ.प्रिया गेडाम उपस्थित होते.





