गोंदिया,दि.27 : जिल्हा पोलीस मुख्यालय कारंजा येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व पोलीस अधीक्षक गोंदिया यांचे संयुक्त वतीने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एम.बी.दुधे यांचे अध्यक्षतेखाली कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली. कार्यक्रमाला मुख्य न्यायदंडाधिकारी एस.जे.भट्टाचार्य, सह दिवाणी न्यायाधीश एन.आर.वानखडे, पोलीस उपअधीक्षक जगदिश पांडे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी एस.जे.भट्टाचार्य व एन.आर.वानखडे यांनी अटक झालेल्या आरोपींचे अधिकार काय असतात आणि आरोपींना झालेली अटक, जमानत व रिमांड संबंधी तपासी अधिकाऱ्यांचे कर्तव्ये काय असतात याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. एम.बी.दुधे यांनी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात उपस्थितांना कायदेविषयक मोलाचे मार्गदर्शन केले.संचालन पोलीस निरीक्षक दिनकर ठोसरे यांनी केले, उपस्थितांचे आभार पोलीस निरीक्षक रंगनाथ धारवाळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर.जी.बोरीकर, एल.पी.पारधी, डी.डी.मेश्राम, गुरुदयाल जैतवार, नोकचंद कापसे, मुलचंद कापसे, पी.एल.व्ही.गोंदिया यांनी सहकार्य केले.




