वाशिम, दि. २7 : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या पोट निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील ८ ग्रामपंचायतींमध्ये थेट निवडणुकीद्वारे सरपंच निवड व १८८ ग्रामपंचायतींमध्ये रिक्त पदांवर सदस्य निवडीसाठी पोट निवडणूक होत आहे. याकरिता ८ डिसेंबर २०१९ रोजी मतदान होणार आहे. सर्व ग्रामपंचायत पोट निवडणूक मतदान केंद्रांवर ८ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत.
प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याने राजकीय पक्षांनी ७ डिसेंबर २०१९ नंतर रात्री १० वाजता नंतर सभा घेऊ नये, धार्मिकस्थळांचा निवडणुकीच्या प्रचारासाठी उपयोग करू नये, आचारसंहितेच्या संपूर्ण काळात सार्वजनिक ठिकाणी शस्त्र जवळ बाळगता येणार नाही, मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या ठिकाणी १०० मीटर परिसरात निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त कोणताही व्यक्ती प्रवेश करणार नाही, असे जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
थेट सरपंच निवडीसाठी पोटनिवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती
जिल्ह्यातील ८ ग्रामपंचातींच्या सरपंच पदाच्या रिक्त जागांसाठी राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये वाशिम तालुक्यातील गोंडेगाव, मालेगाव तालुक्यातील केळी, कुत्तरडोह, रिसोड तालुक्यातील घोन्सर, मंगरूळपीर तालुक्यातील वसंतवाडी, मानोरा तालुक्यातील खांबाळा, कारंजा तालुक्यातील झोडगा व म्हसला या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
सदस्य पदासाठी पोटनिवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती
वाशिम तालुका (३१) : तांदळी बु., वारा जहांगीर, सावंगा जहांगीर, ब्रह्मा, किनखेडा, तोरणाळा, अनसिंग, पिंपळगाव, वाळकी जहांगीर, काजळंबा, वारला, अंजनखेडा, सोनखास, घोटा, हिस्सेबोराळा, सावरगावबर्डे, शेलगाव, असोला जहांगीर, चिखली बु. कार्ली, शेलू बु., नागठाणा, फाळेगाव थेट, सोंडा, सुकळी, ढिल्ली, हिवरा रोहिला, उमरा कापसे, टनका, सूपखेला, देवठाणा.
रिसोड तालुका (४१) : वाघी खु., दापुरी खु. केशवनगर, रिठद, कुकसा, जोगेश्वरी, बेलखेड, हिवरापेन, पार्डी कोयाळी बु., तिखे, कोयाळी खु., किनखेड, लिंगा कोतवाल, घोटा, वाडी रायताळ, निजामपूर, कुऱ्हा, धोडप खुर्द, पेनबोरी, चाखोली, मोहजाबंदी, मांडवा, पिंपरखेड, बोरखेडी, नावली, गोभणी, नेतान्सा, लोणी बु., चिंचंबाभर, वनोजा, कंकरवाडी, केनवड, पळसखेड, व्याड, हराळ, देऊळगाव बंडा, सवड, वाकद, येवती, आगरवाडी, चिंचाबापेन.
कारंजा तालुका (३५) : खेर्डा बु. कार्ली, शेवती, मुरंबी, शेलू बु. , भामदेवी, सोहळ, गायवळ, आखतवाडा, अंतरखेड, भिवरी, भूलोडा, दादगाव, धनज खु., ढगारखेड, धोत्रा देशमुख, दिघी, डोंगरगाव, काकडशिवणी, कामठा, खेर्डा कारंजा, लोहगाव, लोणी अरब, पलाणा, पिंप्री वरघट, पोहा, शहा, शिवण, टाकळी खु., तारखेड, विळेगाव, वडगाव इजारा, वढवी, वाघोला.
मानोरा तालुका (३५) : वापटा, आमगव्हाण, चोंढी, कारपा, सोमनाथनगर, हातना, माहुली, गिर्डा, वसंतनगर, खापरदरी, रुद्राळा, म्हसनी, रोहणा, जनुना खु., पोहरादेवी, आमदरी, धावंडा, भुली, पंचाळा, हिवरा खु. वटफळ, साखरडोह, अभईखेडा, भिलडोंगर, गोस्ता, भोयणी, देवठाना, सावळी, रुई, गव्हा, तळप बु., कोंडोली, पारवा, अजनी, दापुरा खुर्द.
मंगरूळपीर तालुका (१९) : पार्डी ताड, भडकुंभा, निंबी, कासोळा, पारवा, मानोली, कोठारी, पिंपळखुटा, जोगलदरी, चांधई, पिंपळगाव, कुंभी, गोलवाडी, पिंप्री खु. मोतसावंगा, मसोला बु., दाभा, चिखली, ईचा.
मालेगाव तालुका (२४) : चांडस, उमरवाडी, बोरगाव, जोडगव्हाण, डोंगरकिन्ही, भौरद, सोनाळा, बोराळा न. का., गांगलवाडी, कवरदरी, खैरखेडा, आमखेडा, तरोडी, हनवतखेडा, झोडगा बु., मसला खु., पिंपळा, मुंगळा, वाकळवाडी, वाघळूद, दुधाळा, पानगरी धनकुटे, राजुरा, माळेगाव न.कि.
२ डिसेंबर रोजीचा लोकशाही दिन रद्द
वाशिम, : राज्य निवडणूक आयोगाने १९ नोव्हेंबर २०१९ रोजी वाशिम जिल्हा परिषद व त्या अंतर्गत ६ पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याच दिवसापासून जिल्ह्यात निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे.शासनाच्या २६ सप्टेंबर २०१२ च्या परिपत्रकानुसार आचाररसंहिता लागू असताना जिल्हास्तरीय लोकशाही दिन राबविता येत नाही. त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी, २ डिसेंबर २०१९ रोजी होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.




