26.3 C
Gondiā
Thursday, August 6, 2026
Home Top News नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सुरु, सुप्रिया सुळेंकडून फडणवीसांचं स्वागत, आदित्य ठाकरे,अजित पवारांची घेतली...

नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सुरु, सुप्रिया सुळेंकडून फडणवीसांचं स्वागत, आदित्य ठाकरे,अजित पवारांची घेतली गळाभेट

0
67

मुंबई,दि.27- महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन मंगळवारी सुरु झाले. अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी सर्वात पहिले देवेंद्र फडणवीस यांना शपथ दिली. कोळंबकर सर्व 288 आमदारांना शपथ देणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विधानसभेत सर्व आमदारांचे स्वागत केले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी भाऊ अजित पवार व शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांची गळाभेट घेतली. यावेळी सुप्रिया सुळेंनी सांगितले की, “आमची जबाबदारी आता वाढली असून संपूर्ण महाराष्ट्राची जनता आमच्यासोबत आहे.”blank

अनेक नाट्यमय घडामोडींनंतर अखेर राज्यात सरकार स्थापन होणार आहे. नव्या सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला असून 28 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6.40 वाजता दादर येथील शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. तत्पूर्वी विधिमंडळात सर्व आमदारांचा शपथविधी संपन्न होत आहे. हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर सर्व आमदारांना पद आणि गोपनियतेची शपथ देत आहेत.

Live Updates:- प्रणिती शिंदेंनी घेतली आमदारकीची शपथ- विजय वडेट्टीवार यांनी घेतली आमदारकीची शपथ- भास्कर जाधव यांनी घेतली आमदारकीची शपथ- पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली आमदारकीची शपथ- चंद्रकांत पाटील यांनी घेतली आमदारकीची शपथ- राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतली आमदारकीची शपथ- एकनाथ शिंदेंनी घेतली आमदारकीची शपथ- गणेश नाईक यांनी घेतली आमदारकीची शपथ –  अजित पवारांनी घेतली आमदारकीची शपथ- छगन भुजबळांनी घेतली आमदारकीची शपथ- काँग्रेस नेते अशोक चव्हाणांनी घेतली आमदारकीची शपथ- विधानसभेचे माजी अध्यक्ष हरीभाऊ बागडेंनी आमदारकीची शपथ घेतली- माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली आमदारकीची शपथ- विधिमंडळ अधिवेशनाच्या एकदिवसीय विशेष सत्राला सुरुवात”,

शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचे राज्यपालांकडे पत्र

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मंगळवारी रात्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार स्थापनेचा दावा राज्यपालांकडे केला. शिवसेेनेला पाठिंबा असल्याचे पत्र दाेन्ही काॅंग्रेसच्या नेत्यांनी राज्यपालांकडे यावेळी सुपूर्दही केले.

शपथविधी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी सायं. ६.४० वा. शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. काही मंत्र्यांचाही शपथविधी हाेईल.