नवी दिल्ली,दि.27ः- केंद्र सरकारने आज(बुधवार) माहिती दिली की, सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय 60 वरुन 58 केले जाणार नाही. कामगार राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना हे स्पष्टीकरण दिले.केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये 6.83 लाखाहून अधिक पदे रिक्त आहेत, अशी माहिती कामगार राज्यमंत्री जितेंद्र सिंह आज बुधवारी लोकसभेत दिली. केंद्र सरकारच्या, 38,02,779 च्या मंजूर पदांच्या तुलनेत 1 मार्च, 2018 पर्यंत 31,18, 956 जागा भरल्या गेल्या, असे त्यात म्हटले आहे.रिक्त पदांवरील भरती ही एक सततची प्रक्रिया आहे. विभागाकडून रिक्त पदे भरल्याची नोंद झाल्यावर काही नवीन पदे रिक्त झाल्या आहेत, असे जितेंद्र सिंह यांनी लेखी उत्तरात सांगितले. ते म्हणाले की जेव्हा एखादे पद दोन किंवा तीन वर्षांहून अधिक काळ रिकामे असते तेव्हा ते ‘रद्द मानले जाते.





