37.1 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ चार वर्षानंतर मिळाला पूर्णवेळ जिल्हा समाज कल्याण अधिकारी

चार वर्षानंतर मिळाला पूर्णवेळ जिल्हा समाज कल्याण अधिकारी

0
64

blank

गोंदिया,दि.28ःमागील चार वर्षापासून जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग हा प्रभारी अधिकार्‍यांच्या भरोश्यावर चालत होता. मात्र पूर्ण वेळ जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिळाला नव्हता. यातच २७ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेत जिल्हा समाज कल्याण अधिकारी म्हणून तुकाराम बरगे रूजु झाले आहेत. जिल्हा समाज कल्याण सभापती विश्‍वजित डोंगरे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी समाज कल्याण सहायक योगेश कडव उपस्थित होते. तुकाराम बरगे हे पुणे येथे शिक्षण विभागात सहायक आयुक्त म्हणून कार्यरत होते.
विशेष म्हणजे मागील चार वर्षात मिलिंद रामटेके, श्रीमती कवाळे व आता वाळके यांनी प्रभारी अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळला आहे. परत चार वर्षानंतर पूर्ण वेळ अधिकारी रूजु झाल्याने नागरिकांच्या रेंगाळलेल्या कामांना गती मिळणार आहे.

blank