36 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home राजकीय पदवीधरांना न्याय देण्याकरिताच महाविकास आघाडी रिंगणात – डॉ बबनराव तायवाडे

पदवीधरांना न्याय देण्याकरिताच महाविकास आघाडी रिंगणात – डॉ बबनराव तायवाडे

0
31

blank

ऍड अभिजित गोविंदराव वंजारी यांना महाविकास आघाडीची उमेदवारी निश्चित

भंडारा,दि.28ः-महाराष्ट्र राज्य विधान परिषद पदवीधर मतदार संघ म्हणजे बेरोजगार, पदवीधर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना न्याय देण्याचे माध्यम आहे. या पदवीधर घटकांना न्याय देण्याकरिता महाविकास आघाडी संपूर्ण ताकतीने रिंगणात उतरली आहे असे प्रतिपादन काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ बबनराव तायवाडे यांनी भंडारा येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत तसेच पदवीधर मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून बोलतांना केले. पुढे ते म्हणाले कि, पदवीधर मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्यांनी पदवीधर बेरोजगारांच्या समस्येकडे कधीच लक्ष दिले नाही ते केवळ आणि केवळ स्वतःच्या पक्षाचे राजकारण करण्यात मशगुल राहिले. म्हणून या वेळेस खऱ्या अर्थाने या क्षेत्रात पदवीधरांचे प्रश्न अनेक वर्षांपासून धसास लावणारे विद्यापीठात गेल्या वीस वर्षांपासून सक्रिय असणारे ऍड अभिजित वंजारी यांना महाविकास आघाडीने रिंगणात उतरवण्याचे ठरविले. त्यांची उमेदवारी निश्चित झाली असून घोषणेची औपचारिकता मात्र तेवढी उरली. सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात पदवीधरांची नोंदणी करण्याचे आवाहन सुद्धा डॉ बबनराव तायवाडे यांनी केले. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी डॉ बबनराव तायवाडे, युवा पदवीधर नेते ऍड अभिजित वंजारी, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, मा नानाभाऊ पंचबुद्धे, माजी खासदार मधुकर कुकडे, माजी आमदार ऍड आनंदराव वंजारी, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते सुनील फुंडे, महासचिव धनंजय दलाल, भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर, जिया पटेल, किरणभाऊ पांडव, काँग्रेस प्रदेश सचिव प्रमोद तितिरमारे, बशीर पटेल, प्रशांत पवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीला सुनीलभाऊ फुंडे यांनी प्रास्ताविक केले त्यात त्यांनी सदर निवडणूक हि दर सहा वर्षांनी होत असते, यावेळी प्रथमच महाविकास आघाडी मतदान नोंदणीपासूनच सक्रिय झाली आहे. जिल्ह्यातील सर्व पदवीधरांची नोंदणी केली जाईल असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे म्हणाले कि, प्रत्येक निवडणुकीत जातीची गोळाबेरीज करणारे या पदवीधर मतदार संघात केव्हा जागृत होणार? असा सवाल केला. नियोजन पद्धतीने निवडणूक लढविणाचे कानमंत्र त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिले. ऍड अभिजित वंजारी म्हणाले कि, “माझ्यावर महाविकास आघाडीने जो विश्वास टाकला त्यास तडा जाऊ देणार नाही” असा संकल्प केला. अन्य जेष्ठ नेत्यांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन मुकुंद साखरकर यांनी तर आभार प्रदर्शन महेंद्र निंबार्ते यांनी केले. सदर कार्यक्रमाला प्रशांत देशकर, होमराज कापगते, शंकर राऊत, अमर रगडे, अनिक जमा पटेल,धनराज साठवणे, सोहेल खान, संजय केवट, प्यारेलाल वाघमारे, नरेंद्र झंझाळ, सुभाष आजबले, राजू हेडाऊ, अशोक मोहरकर, सरिता मदनकर, नेहा शेंडे, स्वप्नील नाशिणे, बालू ठवकर, रणवीर भगत, भानू बनकर, दयानंद नखाते, प्रा अशोक पारधी, बाळा भिवगडे, विपीन कामडी, डॉ विनोद भोयर, जनार्धन निंबार्ते, सचिन फाले, हेमंत महाकाळकर, आशिष पात्रे, दिलीप निखाडे, सूर्यकांत इलमे, सचिन घनमारे, डॉ श्रीकांत वैरागडे, प्रा नारायणसिंग राजपूत, राजू सूर्यवंशी, महेश कोराम, सुनील साखरकर,राजू निर्वाण, पप्पू गिऱ्हेपुंजे, यशपाल कराळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व घटक दल महाविकास आघाडीचे तसेच यंग टीचर्स असोशिएशन, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, विजुक्टा पदवीधर महासंघ, व्होकेशनल टीचर्स असोशिएशन आदी शैक्षणिक संघटनांचे पदाधीकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

blank