37.1 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ रस्ता सुरक्षा विषयक महावॉकेथॉन रॅलीतून केली जनजागृती

रस्ता सुरक्षा विषयक महावॉकेथॉन रॅलीतून केली जनजागृती

0
30

blank

अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांचा सहभाग

वाशिम, दि. 30 : रस्ता सुरक्षा विषयक नो-हॉर्न आणि सुरक्षीत वाहन चालविणे यासाठी जनजागृती करणाऱ्या महावॉकेथॉन रॅलीचे आयोजन 30 नोव्हेंबर रोजी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्तवतीने करण्यात आले होते. या रॅलीमध्ये अनेकांनी सहभाग घेतला सकाळी 8 वाजता जिल्हा क्रीडा संकुल येथून रॅलीला प्रारंभ झाला. ही रॅली जिल्हा क्रीडा संकुल मार्गे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पाटणी चौक, अकोला नाका, नगर परिषद कार्यालय या मार्गाने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे मार्गक्रमण करीत पोहोचली.

रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी प्रभारी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती समरीन सलिम सय्यद यांचे मार्गदर्शन लाभले. रॅलीमध्ये बाकलीवाल विद्यालयाचे शिक्षक श्री. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एन.सी.सीचे विद्यार्थी यांनी रस्ता सुरक्षा विषयक विविध घोषणा रॅलीदरम्यान देवून पथनाटय देखील सादर केले. या रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी घोषणा व पथनाटयाच्या माध्यमातून नागरीकांमध्ये रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती केली. रॅलीत मोटार वाहन निरीक्षक एस.बी. खंडागळे, ए.ए. कदम, एस.जी. पल्लेवाड, एस.ए. सोयेगावकर, एस.आर. पगार यांचेसह उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच राजस्थान आर्य कॉलजचे प्राचार्य डॉ. संचेती तसेच प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी देखील सहभागी झाले होते.

blank