29.8 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home विदर्भ ‘त्या’ समाजकंटकाला अटक करा

‘त्या’ समाजकंटकाला अटक करा

0
41

 गोंदिया,दि.01ः-क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह व अपशब्द लिहिणार्‍या समाजकंटकाला तातडीने गुन्हा दाखल करुन अटक करण्यात यावे, अशी मागणी महात्मा फुले यांना मानणार्या समाजबांधवांनी केली आहे. तसे निवेदन उपविभागीय अधिकार्‍यांमार्फत राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.
निवेदनानुसार, महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीला २८ नोव्हेंबर रोजी शुभम निकम पाटील नावाच्या समाजकंटकाने महात्मा फुले यांच्याबद्दल अपशब्द व आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर वारंवार टाकली. हा प्रकार महात्मा फुले यांचा अवमान करणारा, तसेच महात्मा फुले यांना मानणाड्ढया समाजबांधवांची मने दुखावणारा आहे. अशा आक्षेपार्ह पोस्टमुळे समाजामध्ये असंतोष व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे त्या समाजकंटकावर गुन्हा दाखल करुन तातडीने अटक करण्यात यावी, अशी समाजबांधवांची मागणी आहे.निवेदन देताना, तिर्थराज उके, संतोष बनकर, अंजली बावनकर, संदिप शहारे,सुजीत जांभूळकर, गणेश सुलाखे, लुकेश पटले, देवेंद्र मेंढे, देवानंद निर्विकार, संतोष खरवडे, किशोर भोयर, अशोक काळे आदी समाजबांधव उपस्थित होते

blank