26.3 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home विदर्भ समाजातील विषमता नष्ट करणे महात्मा ज्योतिबा फुलेचे ध्येय : माजी मंत्री बडोले

समाजातील विषमता नष्ट करणे महात्मा ज्योतिबा फुलेचे ध्येय : माजी मंत्री बडोले

0
49

सडक अर्जुनी,दि.02ः-  सामाजिक विषमते विरूद्ध आवाज उठवुन समाजाला जागवण्याचे,सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी करून समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचविणे ज्योतिबाचे ध्येय असल्याचे महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त राका येथे माजी मंत्री राजकुमार बडोले म्हणाले. पुढे बडोले म्हणाले दलित, शोषित, पीडितांना समाजात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी महात्मा फुले यांनी जीवनभर लढा देऊन सावित्रीआर्इंच्या सोबतीने त्यांनी मुलींसाठी भारतातील पहिली शाळा काढली.अशा अनेक कार्यामुळे आधुनिक महाराष्ट्राचे समाजसुधारक म्हणून त्यांना ओळखले जात असल्याचे सांगितले.

पुढे बडोले म्हणाले शिक्षण हा तिसरा डोळाच मानले जाते आणि त्यामुळेच म. फुले यांनी शिक्षणावर अधिक प्रकाश टाकला आहे आणि शिक्षण कोणत्याही एका व्यक्तीची मक्तेदारी न बनता, सर्वांना शिक्षण मिळावे, शिक्षणाचा प्रसार होऊन, ज्ञान व विचारांची वृद्धी व्हावी यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना करून स्त्रियांसाठी तसेच मागासलेल्या अनाथाच्या शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. यावेळी महात्मा फुले माळी समाज राकाच्या वतीने राजकुमार बडोले यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी माधुरीताई पाथोडे  (जिल्हा परिषद सदस्य गोंदिया),सदुभाऊ विठ्ठले अध्यक्ष माळी महासंघ गोंदिया,किशोर मदनगर,वसंत उपरीकर उपसरपंच राका,प्रकाश तुमाने,भास्कर देवकर माजी सरपंच राका,अर्चना मेश्राम,पुष्प गोटेफोडे,मारुती डोये,अरुण मारवडे, वासुदेव उपरीकर आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

blank