26.3 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home विदर्भ दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्रात किटकजन्य आजारांचा आढावा

दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्रात किटकजन्य आजारांचा आढावा

0
14
  • जन आरोग्य समितीच्या बैठकीत फॉगिंग, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावे

गोंदिया दि. 29 :  पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सद्य स्थितीतील हिवताप जन्य परिस्थिती व वाढत्या किटकजन्य आजारांचा प्रसार रोखण्यासाठी दि. 28 जुलै 2026 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसा येथे ‘जन आरोग्य समिती’च्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत परिसरातील आरोग्य स्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

दि. 28 जुलै रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसा येथील ‘जन आरोग्य समिती’च्या विशेष बैठकीत अध्यक्ष जन आरोग्य समिती तथा जि.प.सदस्या गीताताई लिल्हारे, सालेकसा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील आत्राम,पंचायत समिती सदस्या,सुनीताताई राऊत,पिपरियाचे सरपंच गुणारामजी मेहर,जमकुडोचे सरपंच नूतनताई सोनावणे,वैद्यकीय अधिकारी डॉ.पारस गिरी यांचे उपस्थितीत संपन्न झाली.

बैठकीदरम्यान जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांनी दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमधील किटकजन्य आजारांच्या सद्यस्थिती आढावा घेतला.डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावागावांत तात्काळ फॉगिंग (धूर फवारणी), डी-लारवा करण्याचे निर्देश त्यांनी दिले.तसेच, आरोग्य यंत्रणेला पूर्ण सहकार्य करून स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन त्यांनी स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थांना केले.

जन आरोग्य समिती सभे दरम्यान लोकप्रतिनीधी व समाजसेवक त्यात मधूजी ओकटे, ओमप्रकाश लिल्हारे, गोविंदजी मरसकोल्हे, देवराजजी मरसकोल्हे, सुरेलाल मडावी,वैद्यकीय अधिकारी डॉ.शितालप्रसाद म्हैसकर यांचेसह दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आरोग्य विभागाचे आवाहन

“पावसाळ्यात साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती वेगाने होते. त्यामुळे नागरिकांनी आपल्या परिसरात साचलेले पाणी वाहते करणे, आठवड्यातून एकदा ‘कोरडा दिवस’ पाळावा आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना फवारणी व तपासणी कामात सहकार्य करावे.”