गडचिरोली,दि.3 : जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. अनिल रुडे यांच्या मार्गदर्शनात दिनांक 01.12.2019 रोजी जागतिक एड्स दिन व पंधरवडा साजरा करण्याकरीता जनजागृती होण्याकरीता जिल्हा महिला व बाल रुग्णालय येथून रॅलीला सुरुवात करण्यात आली. मित्र परिवार कलामंच तर्फे एचआयव्ही/एड्स या विषयावर पथनाटय सादर करण्यात आल्यानंतर रॅलीचे समारोपीय कार्यक्रम जिल्हा महिला व बाल रुग्णालय येथे पार पाडण्यात आले. या कार्यक्रमाचे समारोपीय कार्यक्रम जिल्हा महिला व बाल रुग्णालय येथे पार पाडण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. अनिल रुडे, जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. किलनाके मॅडम अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. धुर्वे, बाहय संपर्क अधिकारी, महिला व बाल रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सोयाम, डॉ. मैदमवार रक्त संक्रमण अधिकारी, डॉ. साखरे मॅडम, पोलीस विभागाचे प्रविण आठवले तसेच महेश भांडेकर जिल्हा कार्यक्रम अधिकारी, स्कॉऊट गाईड विद्यार्थी, शिक्षक व नर्सींग स्कुलचे विद्यार्थी तसेच सर्व महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात डॉ. अनिल रुडे यांनी एचआयव्ही/एड्स व लैंगीक आजार विषयी तसेच या वर्षाचे घोषवाक्य “समाज बदल घडवू शकतो” आणि जनजागृती पंधरवाडयात होणाऱ्या विविध कार्यक्रमाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
जागतिक एड्स दिनानिमित्त महाविद्यालयातील व शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने सहभाग घेतला. कार्यक्रमाकरीता महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेतील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते. जिल्हा महिला बाल रुग्णालयातील स्टॉफ नर्स तसेच वाहतुक नियंत्रण कर्मचारी व इतर कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे संचालन राजेश गोंडाने, आभार प्रदर्शन कु.सविता वैद्य यांनी केले.





