26.3 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home विदर्भ ३ ठिकाणी परिवहन कार्यालयाचे विशेष नोंदणी कॅम्प

३ ठिकाणी परिवहन कार्यालयाचे विशेष नोंदणी कॅम्प

0
33

गोंदिया,दि.04ःःजिल्ह्यातील वाहनचालकांना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून विविध कागदपत्रे व परवाने मिळविण्यासाठी जिल्हा मुख्यालयी दूरवर यावे लागते. त्यांचा हा त्रास वाचाना यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे देवरी, अजुर्नी मोर व तिरोडा येथे वाचनचालकांसाठी विशेष कॅम्प लावण्यात येणार आहेत.डिसेंबर महिन्यात १0 तारखेला तिरोडा, १७ तारखेला देवरी तर २४ तारखेला अर्जुनी मोर येथे शिबीर घेण्यात येईल. या शिबिराचे आयाोजन तालुकास्थळाच्या शासकीय विर्शामगृहात करण्यात येणार आहे.
उपप्रादेशिक परिवहन विभागाव्दारे पाच वर्षांपूर्वी शिकावू परवाने तयार करण्यासाठी विशेष कॅम्प घेतले जात होते. परंतु, अशा कॅम्पमध्ये आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचे निर्देशनास आले होते. तसेच पूर्वी सामाजिक संघटनेव्दारे देखील शिकावू परवाने तयार करण्यासाठी शिबिरांचे आयोजन करण्यात येत होते. मात्र, प्रशासकीय प्रक्रिया परिवहन विभाग राबवित असले तरी या शिबिरांचे श्रेय संघटना लाटत होत्या. त्यामुळे असे कॅम्प बंद करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना वाहन नोंदणी, परवाना व वाहनासंदर्भातील विविध कागदपत्रे मिळविण्यासाठी गोंदिया मुख्यालयी यावे लागत होते. परिणामी अनेक वाहनचालकांकडे आवश्यक कागदपत्रे नसल्याचे परिवहन विभागाच्या आजवरच्या कारवायांवरून समोर आले आहे. त्यामुळे आता डिसेंबर महिन्यापासून उपप्रादेशिक परिवहन विभागाव्दारे जिल्ह्यातील देवरी, अर्जुनी मोर व तिरोडा येथे विशेष कॅम्प घेतले जाणार आहेत. यासाठी वाहनचालकांना शिबीराच्या पाच दिवसाआधी परिवहन विभागाच्या वेबसाईटवर ऑनलाइन नोंदणी करुन संबंधित कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी म्हटले आहे.