31.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ महाआघाडीचा पदवीधर मेळावा गुरुवारला गोंदियात

महाआघाडीचा पदवीधर मेळावा गुरुवारला गोंदियात

0
36

गोंदिया,दि.4ः- महाराष्ट्र राज्य विधानपरिषद नागपूर विभागाच्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने गोंदिया येथे उद्या गुरुवार 5 डिसेबंरला महाआघाडीतील घटक पक्षाच्यावतीने पदवीधर मेळावा द्वारका लाॅन येथे दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आला आहे.महाआघाडीतील गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटी,राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी,विदर्भ माध्य.शिक्षक संघ,विदर्भ ज्युनियर टिचर्स असो.यंग टिचर्स असो.प्रोफेशनल टिचर्स असो.च्यावतीने आयोजित या मेळाव्याला काँग्रेसचे प्रदेश महासचिव डाॅ.बबनराव तायवाडे,अड अभिजित वंजारी,आमदार सहसराम कोरेटे,आमदार मनोहर चंद्रिकापुरे,माजी खासदार डाॅ.खुशाल बोपचे,माजी आमदार राजेंद्र जैन,काँग्रेस प्रदेश सचिव विनोद जैन,काँग्रेस जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन,पी.जी.कटरे,सभापती लता दोनोडे यांच्यासह आघाडीचे सर्व कमिट्यांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.या मेळाव्याला महाआघाडीच्या सर्व पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रदेश सचिव अमर वराडे,पदवीधर मतदारसंघ समन्वयक प्रा.एन.डी.किरसान यांनी केले आहे.